Short News

टीम इंडिया ‘Selfish’, माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची टीका

टीम इंडिया ‘Selfish’, माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची टीका

स्ट्रेलिया दौऱ्यात दिवस-रात्र कसोटी सामने खेळण्यासाठी नकार देणाऱ्या भारतीय क्रिकेट संघावर, ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मार्क वॉ नाराज झाला आहे. अॅडलेड कसोटी दिवस-रात्र पद्धतीत खेळायला नकार देऊन, टीम इंडियाने आपला स्वार्थीपणा दाखवला असल्याचे मार्क वॉ म्हणाला. Big Sports Breakfast या रेडीयो चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मार्क वॉने बीसीसीआयवर टीकेची झोड उठवली आहे. 
22 मे 2018 : मुंबईत पेट्रोल 30 पैसे तर डिझेल 26 पैशांनी महाग

22 मे 2018 : मुंबईत पेट्रोल 30 पैसे तर डिझेल 26 पैशांनी महाग

मागील दोन-तीन आठवड्यापासून स्थिर असलेले इंधनाचे दर वाढू लागले आहेत. आज मुंबईत पेट्रोलच्या दरात 33 पैशांनी वाढ झाली, तर डिझेलमध्ये 26 पैशांची वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीतही इंधनाच्या दरात वाढ झालेली आहे. मुंबईत पेट्रोल 84.70 रु.प्रतिलिटर. तर डिझेल 72.48 रु. प्रतिलिटर आहे. दिल्लीत पेट्रोल 76.87 रु.प्रतिलिटर तर डिझेल 68.08 रु. प्रतिलिटर आहे.
पाकिस्तान गोळीबारात आठ महिन्याच्या बाळाचा मृत्यू

पाकिस्तान गोळीबारात आठ महिन्याच्या बाळाचा मृत्यू

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एक आठ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमधील सीरी कालाय गावात ही दुर्देवी घटना घडली. मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. सोमवारी रात्रभर आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला.
अमित शहांचे लक्ष्य आता पुडुच्चेरी

अमित शहांचे लक्ष्य आता पुडुच्चेरी

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आता पुडुच्चेरीवर लक्ष्य केंद्रित केले आहे. तेथील काँग्रेसचे सरकार त्यांना खाली खेचायचे आहे. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाह जुलैमध्ये पुडुच्चेरीला जाणार आहेत. तेथील काँग्रेसचे व्ही. नारायणस्वामी यांचे सरकार क्षीण बहुमतावर उभे असून, ते पडावे, असे ते गेले पाहिजे, असे शहा यांचे प्रयत्न आहेत. तेथील ३० सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसचे १५ आमदार आहे.