Short News

तेजस्विनी सावंतला ऑलम्पिकमध्येही सुवर्णाची अपेक्षा

तेजस्विनी सावंतला ऑलम्पिकमध्येही सुवर्णाची अपेक्षा

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या नेमबाज तेजस्विनी सावंत यांचे पुणे विमानतळावर आज सकाळी मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले. खेळांमधील परिस्थिती आता बदलली आहे. मुलींनीही खेळांमधील आपले सुप्त गुण जोपासत पुढे यायला हवे, माझ्यासाठी आता पुढील सुवर्णपदक हे 2020च्या ऑलम्पिकचेच असेल, असा विश्वास सुवर्णपदक विजेत्या नेमबाज तेजस्विनी सावंत यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 
नो कॅश : आता होणार कोणी एटीएममधून किती पैसे काढल्याची चौकशी

नो कॅश : आता होणार कोणी एटीएममधून किती पैसे काढल्याची चौकशी

देशाच्या काही भागात जाणवत असलेली रोकड टंचाई आणि त्यावरून होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार खडबडून जागे झाले आहे. ही टंचाई दूर करण्यासाठी पावले उचलतानाच कोणत्या एटीएम केंद्रातून, कोणी आणि किती रोकड काढली आणि त्यामागचे कारण काय याची चौकशी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटतर्फे ही चौकशी केली जाणार आहे. 
चंद्रपुरात तापमानाचा पारा 45 अंशावर, राज्यातील 18 जिल्ह्यात उष्णतेची लाट

चंद्रपुरात तापमानाचा पारा 45 अंशावर, राज्यातील 18 जिल्ह्यात उष्णतेची लाट

विदर्भातील अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यात उष्णतेची लाट आली आहे. सोमवारपर्यंत ही स्थिती कायम राहाणार असल्याचा इशारा प्रादेशिक हवामान कार्यालयाने दिला आहे. महाराष्ट्रातील 18 हून अधिक जिल्ह्यांत पारा 40 अंशांवर पोहोचला. चंद्रपूरमध्ये 45.9 अंशांसह सलग तिसऱ्या दिवशी देशात सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आला आहे. तर सर्वच जिल्ह्यांत तापमान 41 अंशांवर नोंदवण्यात आले आहे. 
अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना आता फाशी, केंद्राची मंजूरी

अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना आता फाशी, केंद्राची मंजूरी

कठुआ-उन्नाव-सूरत सामूहिक बलात्काराच्या घटनानंतर देशभरातून आक्रोश व्यक्त होत आहे. उन्नाव येथील प्रकरणात भाजप आमदारच मुख्य आरोपी आहे. यावरुन केंद्रातील मोदी सरकारवर देशभरातून प्रश्नांचा भडीमार होत असताना सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला. 12 वर्षांच्या आतील मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात केली जाईल. कायदा करण्यासाठी अध्यादेश आणण्यास कॅबिनेटने मंजूरी दिली.