Short News

सेरेना विल्यम्स विम्बल्डनच्या अंतिम फेरीत

सेरेना विल्यम्स विम्बल्डनच्या अंतिम फेरीत

आई झाल्यानंतर टेनिस कोर्टवर सेरेना विल्यम्सने जोरदार पुनरागमन केलेय. सेरेनाने विम्बल्डन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. सेरेनाने दहावी अंतिम फेरी गाठण्याची किमया केली आहे. अंतिम फेरीत सेरेनाची गाठ अँजेलिक कर्बरशी पडणार आहे. सेरेनाने उपांत्य फेरीत जर्मनीच्या ज्युलिया जॉर्जसचा ६-२, ६-४ असा सरळ सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
हिंजवडी  IT पार्कमधील हायटेक Sex Racket वर छापा, 5 दलालांना अटक

हिंजवडी IT पार्कमधील हायटेक Sex Racket वर छापा, 5 दलालांना अटक

पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी भागातील आयटी पार्कमध्ये सोशल मीडियाद्वारे चालणार्‍या वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेने बुधवारी पर्दाफाश केला. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हिंजवडीमधील एका इमारतीत छापा मारुन सात मुलींची सुटका केली तर पाच जणांना अटक केली आहे. दरम्यान एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा तपास करत आहेत. 
मेट्रो 3 च्या रात्रीचे काम बंदच राहणार; मुंबई उच्च न्यायालय

मेट्रो 3 च्या रात्रीचे काम बंदच राहणार; मुंबई उच्च न्यायालय

बहुचर्चित मेट्रो 3 प्रकल्पाच्या कामाला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती आजच्या सुनावणीत कायम ठेवली. मेट्रोच्या कामादरम्यान होणाऱ्या आवाजासंदर्भात महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचा निर्णय येत नाही, तोवर बंदी कायम असल्याचे न्यायालयाने आज सुनावणीत स्पष्ट केले. मुंबई शहरातील मेट्रो ३ च्या कामामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषण आणि वृक्ष तोडणीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.   
महेंद्रसिंग धोनीमुळे दुसऱ्या खेळाडूंवर दबाव ; गंभीरची टीका

महेंद्रसिंग धोनीमुळे दुसऱ्या खेळाडूंवर दबाव ; गंभीरची टीका

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवशीय सीरिजमध्ये भारताच्या दारुण पराभवाचे आता विश्लेषण व्हायला सुरुवात झाली आहे. गांगुली आणि लक्ष्मण या खेळाडूंनी कर्णधार विराट कोहलीच्या निर्णयांवर आक्षेप घेतला आहे. आता भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीरनं धोनवीर निशाणा साधला आहे. धोनीच्या संथ बॅटिंगमुळे त्याच्यासोबत खेळणाऱ्या बॅट्समनवरचा दबाव वाढत असल्याचं गंभीर म्हणाला. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more