Short News

टी20 लीग :  हैदराबादवर बंगळुरूचा  14 धावांनी विजय

टी20 लीग : हैदराबादवर बंगळुरूचा 14 धावांनी विजय

विराट कोहलीच्या बंगलोरने हैदराबादवर अवघ्या 14 धावांनी विजय मिळवला. बंगळुरूने हैदराबादला वीस षटकांत 219 धावांचे मोठे लक्ष्य समोर ठेवले होते. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवरच्या या सामन्यात बंगलोरच्या चार फलंदाजांनी हैदराबादच्या आक्रमणावर यशस्वी हल्ला चढवला. एबी डिव्हिलियर्सनं 39 चेंडूत 69, मोईन अलीने 34 चेंडूंत 65 धावा केल्या होत्या. 
कोलकात्याचा राजस्थानवर 25 धावांनी विजय

कोलकात्याचा राजस्थानवर 25 धावांनी विजय

कोलकात्याने आज राजस्थानवर 25 धावांनी विजय प्राप्त करत थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. कोलकात्याने दिलेले 170 धावाच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान 20 षटकात केवळ 144 धावाच करू शकले. राजस्थानकडून संजु सॅमसन (50) आणि कर्णधार रहाणे (46) यांनी चांगली खेळी केली पण विजय प्राप्त करण्यात अपयश आले. पियूष चावलाने 4 षटकांत 24 धावा देत 2 बळी बाद केले.
कोलकात्याचे राजस्थानपुढे 170 धावांचे आव्हान

कोलकात्याचे राजस्थानपुढे 170 धावांचे आव्हान

कोलकाताने निर्धारीत 20 षटकांत 169 धावा करत राजस्थानसमोर 170 धावांचे आव्हान ठेवले आहे. राजस्थानकडून कर्णधार दिनेश कार्तिकने 38 चेंडूत 4 चौकार 2 षटकाराच्या जोरावर 52 धावा केल्या तर आंद्रे रसेलने 25 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीने 49 धावा करत नाबाद राहिला. राजस्थानकडून क्रिष्णापा गौतमने 3 षटकांत 15 धावा देत 2 गडी बाद केले.
मंत्रीमंडळाच्या बैठकीत पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत दिलासा नाही

मंत्रीमंडळाच्या बैठकीत पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत दिलासा नाही

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पेट्रोल-डिझेलची वाढती दरवाढ रोखण्याबाबत निर्णय होईल अशी आशा होती. मात्र, ही आशा फोल ठरली असून इंधन दरवाढीबाबत बैठकीत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. उलट, पेट्रोलिअम उत्पादनातून मिळणाऱ्या अबकारी कराचा वापर महामार्ग आणि एम्ससारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रुग्णालयांच्या निर्मितीसाठी करण्यात येतो.