Short News

टी20 लीग: पंजाबच्या किंग्सशी 'माही' एकटाच लढला, चेन्नईचा  पराभव

टी20 लीग: पंजाबच्या किंग्सशी 'माही' एकटाच लढला, चेन्नईचा पराभव

किंग्स इलेव्हन पंजाबने आयपीएलच्या चुरशीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सवर अवघ्या 4 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात पंजाबने चेन्नईला विजयासाठी 198 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र महेंद्रसिंग धोनीच्या नाबाद 79 धावांच्या खेळीनंतरही चेन्नईचे प्रयत्न 4 धावांनी कमी पडले. धोनीच्या या खेळीत 6 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. त्याआधी ख्रिस गेलने आपला पहिलाच सामना खेळताना दमदार अर्धशतकी खेळी केली.
पुन्हा मोदी सरकार नाही आले तर भारताला फटका - वुड्स्

पुन्हा मोदी सरकार नाही आले तर भारताला फटका - वुड्स्

भारतात पुन्हा नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेत आले नाही, तर भारतासाठी तो फटका असेल, असे मत आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनी CLSA चे मुख्य रणनितीकार क्रिस्टोफर वुड्स यांनी व्यक्त केले. 'ग्रीड अँड फिअर' या साप्ताहिकातील लेखात त्यांनी हे मत नोंदवले आहे. 2018 या वर्षात भारताने काही खास कामगिरी केली नाही, मात्र तरी आशियात भारतच वरचढ असल्याचे ते म्हणाले. 
उत्तर कोरियात क्षेपणास्त्र परीक्षणांची बंदी - किम जोंग यांची घोषणा

उत्तर कोरियात क्षेपणास्त्र परीक्षणांची बंदी - किम जोंग यांची घोषणा

वारंवार अण्वस्त्र हल्ल्यांची धमकी देणारे उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही असे म्हटले आहे. आजपासूनच हे परीक्षण थांबवण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे. यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प प्रतिक्रिया देताना म्हणाले की, ही जगासाठी आनंदाची बातमी आहे. क्षेपणास्त्रांचे केंद्र बंद करण्यात येणार आहे.
21 एप्रिल 2018 :  इंधानाच्या दराचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला

21 एप्रिल 2018 : इंधानाच्या दराचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढल्याने भारतातील पेट्रोल, डिझेलचे दरही भडकले आहेत. हे सर्व कच्च्या तेलाचा पुरवठा कमी झाल्याने होत आहे. मुंबईत पेट्रोलमध्ये 13 पैसे वाढले आहेत तर डिझेलमध्ये 16 पैशांची वाढ झाली आहे. आज मुंबईत पेट्रोल 82.06 रु.प्रतिलिटर तर डिझेल 69.70रु प्रतिलिटर आहे. राजधानी दिल्लीच्या बाजारातही पेट्रोल 13 पैशांनी तर डिझेल 15 पैशांनी वाढले आहे.