Short News

टी 20 लीग:  हैदराबादचा 5 गडी राखून कोलकत्यावर विजय

टी 20 लीग: हैदराबादचा 5 गडी राखून कोलकत्यावर विजय

जबरदस्त फॉर्मात असलेल्या हैदराबाद संघाने शनिवारी 11 व्या सत्राच्या आयपीएलमध्ये विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली. हैदराबाद संघाने आपल्या तिसऱ्या सामन्यात दोन वेळच्या किताब विजेत्या कोलकाताचा पराभव केला. हैदराबादने 5 गड्यांनी सामना जिंकला. सलगच्या 3 विजयांच्या बळावर हैदराबाद संघाने आता गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान अधिक मजबूत केले. कोलकाता संघाने दिलेल्या 139 धावांचे आव्हान हैदराबादने 5 राखून पार केले.
18 वर्षानंतर मुन्ना आणि मोहिनी पुन्हा येणार एकत्र

18 वर्षानंतर मुन्ना आणि मोहिनी पुन्हा येणार एकत्र

बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर तब्बल 18 वर्षांनंतर पुन्हा रूपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. इंद्र कुमार दिग्दर्शित 'टोटल धमाल' या चित्रपटात अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित एकत्र काम करणार असल्याने चाह्त्यांमुळे कमालीची उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. इंद्र कुमार अनिल कपूर आणि माधुरी यांनी 'बेटा' सिनेमात एकत्र काम केले होते. 
शौचालय नसल्याने ‘या’ राज्यातील सरकारी कर्मचा-यांचे रोखले पगार

शौचालय नसल्याने ‘या’ राज्यातील सरकारी कर्मचा-यांचे रोखले पगार

जम्मू-काश्मिरला हागणदारीमुक्त बनवण्यासाठी सरकारने कडक पावले उचलली आहेत. घरात शौचालय नसलेल्या राज्य सरकारी कर्मचा-यांविरोधात कठोर पावले उचलताना जम्मू-काश्मिर सरकारने त्यांचे पगार रोखले आहेत. येथील किश्तवार जिल्ह्यात 616 सरकारी कर्मचा-यांचा पगार रोखण्यात आला आहे. एका अधिका-याने शनिवारी याबाबत माहिती दिली.जिल्हा विकास आयुक्त अंग्रेज सिंह राणा यांनी हा आदेश काढला आहे.
फळ नाही तर किमान धोंडे तरी पाडू नका - उद्धव ठाकरे

फळ नाही तर किमान धोंडे तरी पाडू नका - उद्धव ठाकरे

हिंदुत्वाच्या मुद्यावर मागची 25 वर्षे तुमच्यासोबत मित्रत्व असताना तुम्हाला जरा अच्छे दिन काय आले तुम्हाला शिवसेना नकोशी वाटते, याचा आम्हाला त्रास होतो, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ‘गोफ' या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते.आमच्या पदरात काही देत नाही किमान धोंडे तरी पाडू नका अशी टीका त्यांनी केली.