Short News

टी20 लीग : सॅमसनने रचला धावांचा डोंगर, बंगळुरूसमोर 218 धावांचे आव्हान

टी20 लीग : सॅमसनने रचला धावांचा डोंगर, बंगळुरूसमोर 218 धावांचे आव्हान

बंगळुरू येथील चिन्नास्वानी स्टेडिअमवर आयपीएल 2018 चा 11वा सामना खेळला जात आहे. बेंगलुरुने नाणेफेक जिंकत राजस्थानला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. परंतु अजिंक्य राहणेच्या राजस्थान संघाने संयमी खेळी करत बंगळुरूसमोर धावांचा डोंगर उभारला. राजस्थाने निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावत 217 धावा केल्या. राजस्थानकडून खेळताना संजू सॅमसनने धमाकेदार फलंदाजी करत नाबाद 92 धावा केल्या.
26 एप्रिल 2018 : मुंबईत पेट्रोल- डिझेलचे दर स्थिर

26 एप्रिल 2018 : मुंबईत पेट्रोल- डिझेलचे दर स्थिर

सलग तीन दिवसापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात स्थिरता दिसत आहे. मुंबई आणि राजधानी दिल्लीच्या बाजारात दर कायम आहेत. मात्र असे असले तरी मुंबईत पेट्रोलने 80 रुपयांचा टप्पा कधीच ओलांडला आहे. यामुळे मिळणारी सुट लोकांना अल्पशी वाटत आहे. मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर 82.48 रु आहे. तर डिझेल 70.20 रुपये प्रतिलिटर आहे. दिल्लीच्या बाजारात पेट्रोल प्रतिलिटर 74.63 आहे. तर डिझेल 65.93 रुपये प्रतिलिटर आहे. 
रेल्वे क्रॉसिंगवर स्कूल व्हॅनला उडवले, चालकासह 11 विद्यार्थ्यांचा मृत्यू

रेल्वे क्रॉसिंगवर स्कूल व्हॅनला उडवले, चालकासह 11 विद्यार्थ्यांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे. रेल्वे क्रॉसिंगवर स्कूल व्हॅनला ट्रेनने धडक दिली, ज्यामध्ये चालकासह 11 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. कुशीनगरच्या डिव्हाईन मिशन स्कूलचे विद्यार्थी ज्या स्कूल बसमधून जात होते, ती मानवरहित रेल्वे क्रॉसिंग पार करत होती. यावेळी वेगाने आलेल्या पॅसेंजर ट्रेनने स्कूल व्हॅनला उडवले.पोलीस आणि प्रशासनाने माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.
प्रियंकाला प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलच्या लग्नाचे आमंत्रण

प्रियंकाला प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलच्या लग्नाचे आमंत्रण

प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलच्या लग्नाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. लंडनमध्ये 19मे रोजी ते दोघे लग्नाच्या गाठीत अडकणार आहेत. या लग्नाचे आमंत्रण बॉलिवूडमधील देखील एका अभिनेत्रीला आले आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून देसी गर्ल प्रियांका चोप्रा आहे.19 मे रोजी होणाऱ्या लग्नाच्या पाहुण्याच्या यादीत प्रियांकाचे नावदेखील सामील आहे. प्रियांका हॉलिवूड अभिनेत्री मेगनची खूप चांगली मैत्रिण आहे.