Short News

टी20 लीग : आज हैदराबाद अन् बंगळुरू आमने - सामने

टी20 लीग : आज हैदराबाद अन् बंगळुरू आमने - सामने

आयपीएलमधील आपले आव्हान टिकवण्यासाठी बंगळुरुचा संघ आज सनरायझर्स हैदराबादशी दोन हात करणार आहे. हा सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर रंगणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी बंगळुरूला फलंदाजीसह गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व्यवस्थित करावे लागणार. मागील दोन सामने बंगळुरूने गच्छाळ क्षेत्ररक्षणामुळे गमावले होते. विराट सेनेच्या आरसीबीने यंदा बारापैकी केवळ पाच सामने जिंकले आहेत.
फॅफ ड्यू प्लेसिची झुंजार खेळी; चेन्नईचा फायनलमध्ये प्रवेश

फॅफ ड्यू प्लेसिची झुंजार खेळी; चेन्नईचा फायनलमध्ये प्रवेश

चेन्नईच्या फॅफ ड्यू प्लेसिने केलेले 42 चेंडूत 67 धावांच्या जोरावर चेन्नईने हैदराबादचे 140 धावांचे आव्हान 19.1 षटकात पार करत शानदार विजय प्राप्त केला. शेवटच्या षटकांत 6 धावांची गरज असताना फॅफ ड्यू प्लेसिने भुवनेश्वरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत हा सामना संपवला. चेन्नईचे एकीकडे विकेट पडत असताना फॅफ ड्यू प्लेसिने एक बाजू लावून धरली. त्याला शार्दुलने 5 चेंडूत 15 धावा करत चांगली साथ दिली.
स्टेट बँक ऑफ इंडियाला ७,७१८ कोटींचा तोटा

स्टेट बँक ऑफ इंडियाला ७,७१८ कोटींचा तोटा

सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाला २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत तब्बल ७,७१८ कोटींचा तोटा झाला आहे. मागील वर्षीच्या अखेरच्या तिमाहीत बँकेनं २,८१५ कोटींच्या नफ्याची नोंद केली होती. थकीत कर्जाच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्यानं हा तोटा वाढला आहे. याआधीच्या तिमाहीत बँकेला २४१६ कोटींचा तोटा झाला होता.
जी. परमेश्वर होणार कर्नाटकचे नवे उपमुख्यमंत्री

जी. परमेश्वर होणार कर्नाटकचे नवे उपमुख्यमंत्री

कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी तर उपमुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे जी. परमेश्वर उद्या शपथ घेणार आहेत. कुमारस्वामी यांनी स्वतः उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार के. आर. रमेश कुमार हे विधानसभा अध्यक्ष असतील. मंगळवारी काँग्रेसच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.