Short News

टी20 लीग: राजस्थानने बदलला नियम, बंगळुरुचा दारुण पराभव

टी20 लीग: राजस्थानने बदलला नियम, बंगळुरुचा दारुण पराभव

राजस्थान संघाने सगळ्यांच्या अपेक्षांना सुरुंग लावला. आयपीएलच्या 11 व्या सत्रात सुरू असलेल्या रुढीला राजस्थान संघाने फाटा देत बंगळुरूला 19 धावांनी मात दिली. आतापर्यंत दुसऱ्यावेळी फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय होत होता. परंतु राजस्थाने या रितीला बांध घालत विजय मिळवला. बंगळुरुकडून विराट व्यतीरिक्त कोणताच खेळाडू आपला करिष्मा दाखवू शकला नाही. राजस्थानने संयमी खेळी करत 218 धावांचे लक्ष्य  दिले होते.
26 एप्रिल 2018 : मुंबईत पेट्रोल- डिझेलचे दर स्थिर

26 एप्रिल 2018 : मुंबईत पेट्रोल- डिझेलचे दर स्थिर

सलग तीन दिवसापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात स्थिरता दिसत आहे. मुंबई आणि राजधानी दिल्लीच्या बाजारात दर कायम आहेत. मात्र असे असले तरी मुंबईत पेट्रोलने 80 रुपयांचा टप्पा कधीच ओलांडला आहे. यामुळे मिळणारी सुट लोकांना अल्पशी वाटत आहे. मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर 82.48 रु आहे. तर डिझेल 70.20 रुपये प्रतिलिटर आहे. दिल्लीच्या बाजारात पेट्रोल प्रतिलिटर 74.63 आहे. तर डिझेल 65.93 रुपये प्रतिलिटर आहे. 
रेल्वे क्रॉसिंगवर स्कूल व्हॅनला उडवले, चालकासह 11 विद्यार्थ्यांचा मृत्यू

रेल्वे क्रॉसिंगवर स्कूल व्हॅनला उडवले, चालकासह 11 विद्यार्थ्यांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे. रेल्वे क्रॉसिंगवर स्कूल व्हॅनला ट्रेनने धडक दिली, ज्यामध्ये चालकासह 11 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. कुशीनगरच्या डिव्हाईन मिशन स्कूलचे विद्यार्थी ज्या स्कूल बसमधून जात होते, ती मानवरहित रेल्वे क्रॉसिंग पार करत होती. यावेळी वेगाने आलेल्या पॅसेंजर ट्रेनने स्कूल व्हॅनला उडवले.पोलीस आणि प्रशासनाने माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.
प्रियंकाला प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलच्या लग्नाचे आमंत्रण

प्रियंकाला प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलच्या लग्नाचे आमंत्रण

प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलच्या लग्नाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. लंडनमध्ये 19मे रोजी ते दोघे लग्नाच्या गाठीत अडकणार आहेत. या लग्नाचे आमंत्रण बॉलिवूडमधील देखील एका अभिनेत्रीला आले आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून देसी गर्ल प्रियांका चोप्रा आहे.19 मे रोजी होणाऱ्या लग्नाच्या पाहुण्याच्या यादीत प्रियांकाचे नावदेखील सामील आहे. प्रियांका हॉलिवूड अभिनेत्री मेगनची खूप चांगली मैत्रिण आहे.