Short News

सिंधुदुर्गातील मांगेली धबधब्याला पर्यटकांची पसंती

सिंधुदुर्गातील मांगेली धबधब्याला पर्यटकांची पसंती

 • सिंधुदुर्गातील मांगेली येथील धबधब्याला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची पसंती मिळत आहे. 
 • हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक येथे प्रचंड गर्दी करत आहेत. 
 • कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र या तीन राज्यांच्या सीमेवर उंच डोंगर कपारीतून कोसळणारा दोडामार्ग तालुक्यातील मांगेली गावचा मनमोहक धबधबा पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत आहे.
वाहतूक कोंडीवर त्याने शोधला उपाय

वाहतूक कोंडीवर त्याने शोधला उपाय

 • जर्मनीमधील म्युनिचमध्ये राहणारे बेंजमिन डेव्हिड या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे प्रचंड त्रस्त होते. 
 • वाहतूक कोंडीमुळे अनेकदा त्यांनी ऑफिसला पोहोचण्यासाठी उशीर व्हायचा. आता त्यांना या समस्येला सामोरं जावं लागत नाही. 
 • कारण ऑफिसला जाण्यासाठी डेव्हिड आता रस्त्याचा नाही, तर नदीच्या मार्गाचा वापर करत आहेत. डेव्हिड रोज दोन किमी पोहून ऑफिसला पोहोचतो
'मलिष्काच्या घरातील अळ्या शोधता त्याप्रमाणे अनधिकृत बांधकामे शोधा'

'मलिष्काच्या घरातील अळ्या शोधता त्याप्रमाणे अनधिकृत बांधकामे शोधा'

 • घाटकोपर येथील इमारत दुर्घटनेत झालेले मृत्यू हे अपघाती नाहीत, तर मानवनिर्मीत हत्या आहेत.
 • या घटनेस मुंबई महानगरपालिका जबाबदार आहे.पालिकेने अनधिकृत बांधकामाच्या नुतनीकरणाला परवानगी दिलीच कशी ? असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे यांनी केला.
 • मलिष्काच्या घरातील अळ्या शोधता येतात मग तसेच अनधिकृत बांधकामेही शोधा,अशी टीका त्यांनी पालिकेवर केली.
मुंबईचे पहारेकरी झोपले होते का - राधाकष्णा विखे-पाटलांचा सवाल

मुंबईचे पहारेकरी झोपले होते का - राधाकष्णा विखे-पाटलांचा सवाल

 • घाटकोपर येथील इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेबाबत शिवसेनेसोबत भाजपलाही लक्ष्य करण्यात येत आहे.
 • इमारत कोसळून १७ जणांचा बळी जात असताना मुंबईचे ‘पहारेकरी' झोपले होते का, अशी विचारणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
 • मुंबई महानगर पालिका प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली असल्याचा आरोपही त्यांनी विधानसभेत केला.