Business Short News

सर्वात स्वस्त फोन झाला लॉन्च, किंमत 250 रुपयांपेक्षाही कमी

सर्वात स्वस्त फोन झाला लॉन्च, किंमत 250 रुपयांपेक्षाही कमी

तुम्ही स्वस्त आणि मस्त असा स्मार्टफोन घेण्याचा विचार करत आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय बाजारपेठेत एक फिचर फोन लॉन्च झाला असून हा स्वस्तही आहे.स्वस्त टेरिफ प्लाननंतर आता मोबाईल कंपन्यांमध्ये स्वस्त फोन देण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. भारतीय मोबाईल ग्राहकांसाठी ई-कॉमर्स वेबसाईट शॉपक्लूजवर 249 रुपयांत फिचर फोन लॉन्च करण्यात आला आहे.
भटकंती करणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी;  विमान तिकीट ३० % स्वस्त

भटकंती करणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी; विमान तिकीट ३० % स्वस्त

 जगभरात भटकंती करणाऱ्या भारतीयांसाठी विमान कंपन्या तिकीट दरात ऑफर्सवर ऑफर्स देऊ लागल्या आहेत. आखाती देशांहून परतीचे तिकीट १० हजार रुपयांत, युरोपीय देशांहून ३३ हजार रुपये तर उत्तर अमेरिकी देशांहून परतीचे तिकीट ५५ हजार रुपयांपासून उपलब्ध आहेत. काही भारतीय आणि विदेशी कंपन्या या पॉप्युलर रुट्ससाठी सामान्य दरांपेक्षा ३० टक्के स्वस्त दरात तिकीट देत आहेत. कंपन्या विविध कालावधीत सेलची ऑफर देत आहेत.
व्हिडिओकॉन कंपनी सुरू,  उद्योगनगरीने घेतला श्वास

व्हिडिओकॉन कंपनी सुरू, उद्योगनगरीने घेतला श्वास

गेल्या बारा दिवसांपासून कामगारांना सक्तीच्या रजा देऊन बंद ठेवण्यात आलेली व्हिडिओकॉन कंपनी आज सुरू झाली आहे. डोक्यावर ४५ हजार कोटींचे कर्ज असलेली व्हिडिओकॉन कंपनी बंद झाल्यामुळे उद्योगनगरीवर अवकळा पसरली होती. पण आज अखेर ही कंपनी सुरू झाल्यामुळे सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. कंपनीने ८ जानेवारी रोजी अंतर्गत मेंटनन्सचे कारण देत जवळपास साडेसहा हजार कर्मचाऱ्यांना सक्तीची रजा दिली होती. 
प्रत्यक्ष कर भरणाऱ्यांमध्ये पुणे विभाग देशात प्रथम

प्रत्यक्ष कर भरणाऱ्यांमध्ये पुणे विभाग देशात प्रथम

प्रत्यक्ष कर भरणाऱ्यांच्या यादीत पुणे विभागाने पहिला क्रमांक पटकावला आहे. अशी माहिती पुण्याचे मुख्य प्राप्तीकर अधिकारी ए.सी.शुक्ला यांनी दिली आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात बजेटच्या ७५.५ टक्के कर एकट्या पुणे विभागाने भरला आहे. १६ जानेवारीपर्यंत एकट्या पुणे विभागातून ३७ हजार ३१० कोटी रुपये प्रत्यक्ष कर म्हणून जमा करण्यात आले आहेत. मागील वर्षापेक्षा हा कर भरणा २३.९८ टक्के इतका आहे.