Short News

12 ऑगस्ट 2018 : मुंबईत डिझेलच्या दरात वाढ

12 ऑगस्ट 2018 : मुंबईत डिझेलच्या दरात वाढ

आज मुंबईच्या बाजारात पेट्रोलच्या दरात कोणतीच वाढ झालेली नाही. पण डिझेलच्या दरात मात्र वाढ झाली आहे. सात पैशांनी डिझेलच्या दरात ही वाढ झाली आहे. यावाढीसह डिझेल प्रतिलिटर 73.01 रुपये आहे. तर पेट्रोलच्या दरात कोणतीच वाढ वा उतरण झाली नसून पेट्रोल प्रतिलिटर 84.67 रुपये आहे. दिल्लीच्या बाजारातही पेट्रोलचे दर स्थिर आहेत. आणि डिझेलच्या दरात 6 पैशांनी वाढ झाली आहे. 
एन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये सचिन खेडेकर दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

एन. टी. रामाराव यांच्या बायोपिकमध्ये सचिन खेडेकर दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

तेलगू चित्रपटसृष्टीतील अभिनेते व आंध्रप्रदेशमधील लोकांच्या देवस्थानी असलेले नेते एन.टी. रामाराव यांच्या जीवनावर चित्रपट बनत असून यात आता हिंदी व मराठी सिनेमामध्ये काम करणारे अभिनेता सचिन खेडेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तेलगू चित्रपटसृष्टीतील अभिनेते व आंध्रप्रदेशमधील लोकांच्या देवस्थानी असलेले नेते एन. टी. रामाराव यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटाचे चित्रीकरण हैदराबादमध्ये पार पडते आहे.
‘चला हवा येऊ द्या’चा ४०० भागांचा यशस्वी टप्पा पार

‘चला हवा येऊ द्या’चा ४०० भागांचा यशस्वी टप्पा पार

गेली साडे तीन वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. डॉ. निलेश साबळे कॅप्टन ऑफ द शिप तर श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके ही तगडी विनोदवीरांची फौज असलेला 'चला हवा येऊ द्या' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाने ४०० भागांचा यशस्वी टप्पा पार पडला आहे.
कसोटीमध्ये मी सलामीही करू शकतो - रोहित शर्मा

कसोटीमध्ये मी सलामीही करू शकतो - रोहित शर्मा

इंग्लंडमधील कसोटी मालिकेत भारताला सलामीची समस्या भेडसावत आहे. कारण शिखर धवन, मुरली विजय आणि लोकेश राहुल हे तिन्ही सलामीवीर अपयशी ठरलेले आहेत. त्यामुळे भारतीय संघ चांगल्या सलामीवीराच्या शोधात आहे. त्याचवेळी भारताचा क्रिकेटपटूरोहित शर्माने मी भारतासाठी कसोटीमध्ये सलामी करण्यातासाठी तयार आहे, असे म्हटले आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more