Short News

'इन्कम टॅक्स रिटर्न' भरण्यासाठी  'बाकी है चार दिन'

'इन्कम टॅक्स रिटर्न' भरण्यासाठी 'बाकी है चार दिन'

'इन्कम टॅक्स रिटर्न' अर्थात प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) भरण्यासाठी अवघे चार दिवस उरले आहेत. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) भरण्याची मुदत एका महिन्याने वाढवली. यापूर्वी ही मुदत 31 जुलैपर्यंत निर्धारित करण्यात आली होती. मात्र त्यांनतर 31 ऑगस्टपर्यंत विवरणपत्र भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. केंद्रीय अर्थमंत्रालयाने एक पत्रक जारी करून ही माहिती दिली होती. 
...तेव्हापासून मुलाच्या शाळेतील क्रिकेट सामन्याकडेही श्रीशांतने फिरवली पाठ

...तेव्हापासून मुलाच्या शाळेतील क्रिकेट सामन्याकडेही श्रीशांतने फिरवली पाठ

क्रिकेटपटू श्रीशांतने 'बिग बॉस' १२ मध्ये एलिमिनेशन झोनमध्ये आलेल्या किर्ती वर्माचं सांत्वन करतेवेळी त्यावने आपल्या आयुष्यातील अडचणीच्या काळाविषयी सांगितलं. क्रिकेटच्या मैदानात आपल्याला प्रवेश नसल्याचं सांगत जवळपास गेल्या ५ वर्षांपासून आपण तसं केलंही नसल्याचं श्रीशांतने स्पष्ट केलं. इतकच नव्हे तर, त्याला कधीच मुलाच्या शाळेत क्रिकेटचं आयोजन केलं असल्यास तेथेही जात नाही. असे सांगितले.
चोरटय़ांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

चोरटय़ांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

दुचाकी रस्त्यामध्ये अडवून चार ते पाच चोरटय़ांनी गुरुवारी मध्यरात्री औरंगाबाद सेन्ट्रल नाका परिसरात केलेल्या बेदम मारहाणीत 23वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. नितीन उर्फ बाळू भीमराव घुगे असे मृत तरुणाचे नाव आहे. नितीन हा मूळचा कन्नड येथील रहिवासी असून सध्या तो जाधववाडी परिसरात राहात होता. पोलिसांकडून ट्रकमालक आणि मृत तरुणाच्या भावाचे जाबजबाब नोंदविणे सुरू असून जबाबात मोठी तफावत समोर येत आहे.
धोनीच्या प्लानमध्ये फसला शाकिब अल हसल

धोनीच्या प्लानमध्ये फसला शाकिब अल हसल

आशिया कपच्या सुपर-४ मॅचमध्ये भारतानं बांगलादेशला ७ विकेटनं हरवलं आहे. बांगलादेशनं ठेवलेलं १७४ रनचं लक्ष्य भारतानं ३६.२ ओव्हरमध्ये ३ विकेट गमावून पूर्ण केलं. या विजयात कॅप्टन रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांच महत्वाच योगदानं राहिलं. पण शाकिब उल हसनला बाद करण्यासाठी धोनीने आपले जाल विणले आणि त्यात शाकिब फसला.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more