Short News

चार वर्षांत शेतकऱ्यांच्या मासिक उत्पन्नात फक्त  2,505 रुपयांची वाढ

चार वर्षांत शेतकऱ्यांच्या मासिक उत्पन्नात फक्त 2,505 रुपयांची वाढ

देशातील शेतकऱ्यांच्या मासिक उत्पन्नात गेल्या चार वर्षांत 2,505 रुपयांची वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये देशातील शेतकऱ्यांचे सरासरी मासिक उत्पन्न ८8,391 रुपये आहे. चार वर्षांपूर्वी ते 6426 रुपये होते. चार वर्षांत मासिक उत्पन्नात 38.98 टक्के वाढ झाली आहे. मासिक उत्पन्नवाढीची हीच गती राहिल्यास 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याचे उद्दिष्ट अपुरे राहण्याची शक्यता आहे.
सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण

सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण

सोनं व्यापाऱ्यांची घटलेली मागणी आणि कमजोर झालेला आंतरराष्ट्रीय बाजार यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव २५० रुपये प्रती तोळ्यानं घटले आहेत. सोन्याची किंमत ३१,४५० रुपये प्रती तोळा झाली आहे. चांदीची किंमत मात्र ७० रुपयांनी वाढून ३८,१५० रुपये झाली आहे.
जॉन आता घेऊन येत आहे या सत्यघटनेवर सिनेमा

जॉन आता घेऊन येत आहे या सत्यघटनेवर सिनेमा

एक सत्य घटनेवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येत आहे. २००८ साली दिल्लीतील ‘बाटला हाऊस' चकमक प्रकरणावर आधारलेला चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित होत आहे. १९ सप्टेंबर २००८ रोजी सकाळी ११ वाजता दक्षिण दिल्लीतील जामिया नगरातील एल-१८ बाटला हाऊस येथे दिल्ली पोलिसांचे विशेष दल आणि इंडियन मुजाहिदीनचे चार अतिरेकी यांच्यात ही चकमक झडली.
गिरगाव चौपाटीवर स्टिंग रे माशांचा वावर; भाविकांना सतर्कतेच्या सूचना

गिरगाव चौपाटीवर स्टिंग रे माशांचा वावर; भाविकांना सतर्कतेच्या सूचना

गिरगाव चौपाटी नजीकच्या समुद्रात स्टिंग रे माशांचा वावर आढळून आला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने अनंत चतुदर्शीच्या दिवशी चौपाटीवर विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. गेल्यावर्षी विसर्जनासाठी समुद्रात उतरलेल्या अनेक लोकांना स्टिंग रे माशांनी दंश केला होता. स्टिंग रे माशाच्या दंशांनंतर असह्य वेदना होतात. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more