Short News

विकासदराची ग्वाही, अर्थव्यवस्था 'मूड'मध्ये

विकासदराची ग्वाही, अर्थव्यवस्था 'मूड'मध्ये

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती हे अर्थव्यवस्थेसमोरील मोठे आव्हान असले तरी, अशा बाह्य दबावाला भारतीय अर्थव्यवस्था पुरून उरेल असा आशावाद आंतरराष्ट्रीय मानांकन संस्था 'मूडीज'ने व्यक्त केला आहे. त्याचमुळे आर्थिक वर्ष २०१८-१९ आणि २०१९-२०मध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेचा दर साडेसात टक्क्यांवर राहील, असेही 'मूडीज'ने नमूद केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ऊर्जेच्या दरांतही वाढ होत आहे.
गोंदियामध्ये पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक

गोंदियामध्ये पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक

जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील कोसबी या जंगलात आज सकाळी 10 च्या सुमारास शोध मोहिमेदरम्यान पोलीस व नक्षल्यामध्ये चकमक झाली. या चकमकीच्या वेळी गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक शोध मोहिमेत सहभागी असल्याची माहिती आहे. गोंदिया जिल्हा हा नक्षल क्षेत्र आहे. येथे नुकतेच एका महिला नक्षलीने गोंदिया जिल्हा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते.  
खूशखबर;  पीपीएफवरील व्याजदरात मोठी  वाढ

खूशखबर; पीपीएफवरील व्याजदरात मोठी वाढ

 सर्वसामान्यांना बसणारे महागाईचे चटके यावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केला. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदरात वाढ करून त्यांनी नोकरदारांना दिलासा दिला आहे. तर किसान विकास पत्रांवरील व्याजदर वाढवून सामान्य गुंतवणूकदारांना खूश केले. पीपीएफवर सध्या 7.6 टक्के दराने व्याज दिले जाते. ते यापुढे 8 टक्क्याने मिळेल,अशी घोषणा अरुण जेटलींनी केली. 
सांगली गर्भपात प्रकरणी दुसरा संशयित डॉक्टर अटकेत

सांगली गर्भपात प्रकरणी दुसरा संशयित डॉक्टर अटकेत

गर्भपात प्रकरणी डॉ. रुपाली चौगुले पाठोपाठ दुसरा संशयित डॉ. विजयकुमार चौगुलेलाही अटक करण्यात आलीय. चौगुलेला सांगली न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय. सांगली महापालिकेने चौगुले हॉस्पिटलचा परवाना रद्द केलाय. या प्रकरणी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान तिसरा संशयित डॉ. स्वप्नील जमदाडेचा शोध सुरू आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more