Movie Short News

हिट अॅण्ड रन : सलमानला दिलासा, अजामीनपात्र वॉरन्ट रद्द

हिट अॅण्ड रन : सलमानला दिलासा, अजामीनपात्र वॉरन्ट रद्द

मुंबई सत्र न्यायालयाने अभिनेता सलमान खानला दिलासा दिला आहे. शनिवारी मुंबई सत्र न्यायालयाने 2002 च्या हिट अॅण्ड रन प्रकरणातील सलमानच्या विरोधाताली अजामीनपात्र वॉरन्ट रद्द केला आहे. 2002 च्या हिट अॅण्ड रन प्रकरणात सलमानविरोधात अजामीनपात्र वॉरन्ट जारी करण्यात आला होता. काही दिवसापुर्वी जोधपूर न्यायालयाने काळवीट शिकारप्रकरणी शिक्षा सुनावली. त्यानंतर जामीनही मंजूर केला.
सोनम -आनंदच्या संगीत कार्यक्रमात करण जोहर लावणार ठुमके

सोनम -आनंदच्या संगीत कार्यक्रमात करण जोहर लावणार ठुमके

सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांच्या लग्नाची तयारी सध्या जोरात सुरु आहे. मे महिन्यात दोघे लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. फराह खान लग्नाच्या संगीत सेरेमनीची तयारी करते आहे. फराह खान या संगीत कार्यक्रमाची कोरियोग्राफी करते आहे. तर या कार्यक्रमाच्या पाहुण्याच्या यादीत करण जोहरेचे नावदेखील सामिल आहे. त्यामुळे सध्या करण सोनमच्या संगीत कार्यक्रमात परफॉर्मे करण्याची तयारीला लागला आहे.
बुडण्याऐवजी डेंग्यूने मरण्याचा धोका जास्त ट्विंकलचे खोचक ट्विट

बुडण्याऐवजी डेंग्यूने मरण्याचा धोका जास्त ट्विंकलचे खोचक ट्विट

अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्नाने नुकतेच एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये ट्विंकलने एअरलाइन्समध्ये असलेल्या अस्वच्छतेवर ताशेरे ओढले आहेत. ‘मुंबईहुन उडणाऱ्या विमानांनी आयुष्याच्या सुरक्षेसाठी ज्याकाही वस्तू ठेवता त्याऐवजी कृपया ओडोमॉस ठेवत जा. आत्ताच सात मच्छर मारले आहेत. बुडून मरण्याऐवजी डेंग्यूने मरण्याचा धोका अधिक आहे.' ट्विंकलच्या या पोस्टनंतर अनेक फॉलोवर्सनी कमेंट करायला सुरूवात केली.   
अलिबागमध्ये मिलिंद-अंकिताचा विवाह

अलिबागमध्ये मिलिंद-अंकिताचा विवाह

गेल्या काही दिवसांपासून मिलिंद सोमण आणि त्याची गर्लफ्रेंड अंकिताच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले होते. अंकिता मिलिंदला सोडून गेली अशा खबर सर्वत्र पसरली होती. मात्र या सर्व अफवांवर दोघांनी न बोलता उत्तर दिले. दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन फोटोज शेअर केले. त्यावरुन या दोघांचे सर्व आलबेल असल्याचे प्रेक्षकांच्या लक्षात आले. हे दोघे अलिबागमध्ये विवाहबद्ध होणार आहेत.