Short News

रणबीर कपूरच्या 'या' कोरिओग्राफरने केली आत्महत्या

रणबीर कपूरच्या 'या' कोरिओग्राफरने केली आत्महत्या

रणबीर कपूर आणि रणवीर सिंहसोहत काम केलेल्या या बॉलिवूडच्या डान्सरने आत्महत्या केली आहे. अभिजीत शिंदे असं या डान्सरच नाव अभिजीत शिंदे असं आहे. अभिजीतने आपल्या राहत्या घरी पंख्याला गळफास लावून घेतला आहे. गुरूवारी अभिजीतचा मृतदेह घरातील पंख्याला लटकताना दिसला. अभिजीतची सुसाइड नोट देखील लिहिली होती. ज्यामध्ये लिहिलं आहे की त्याच्या बँकेतील सर्व पैसे मुलीच्या नावे करावेत.
मध्यप्रदेशात गणपती विसर्जनादरम्यान 2 सख्ख्या भावांसह 4 जणांचा बुडून मृत्यू

मध्यप्रदेशात गणपती विसर्जनादरम्यान 2 सख्ख्या भावांसह 4 जणांचा बुडून मृत्यू

गणपती विसर्जनादरम्यान पाण्याने भरलेल्या 10 फूट खोल खड्ड्यात बुडून दोन सख्ख्या भावांसह चार मुलांचा मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी महाराजपुरा येथील एमिटी यूनिव्हर्सिटीमागे ही हृदयद्रावक घटना घडली. मृत मुले एकाच गावातील होती. गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी सात मुले पाण्यात उतरले होते. त्यापैकी चौघांचा बुडून मृत्यू झाला. 
आशिया कप 2018 : भारताची बांग्लादेशवर 7 विकेटने मात

आशिया कप 2018 : भारताची बांग्लादेशवर 7 विकेटने मात

आशिया कप स्पर्धेतील सुपर फोरमधल्या आजच्या सामन्यात भारताने बांग्लादेशवर 7 विकेटने मात केली. बांग्लादेशने भारतासमोर 174 धावांचे आव्हान ठेवले होते. कर्णधार रोहित शर्माने शानदार नाबाद 83धावा केल्या. भारताकडून शिखर धवन (40) आणि धोनीने (33) चांगली खेळी केली. तत्पुर्वी भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. जाडेजाने शानदार पुनरागमन करत 4 विकेट घेतल्या तर भुवी आणि बुमराहने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.
रुग्णालयातील कर्मचाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

रुग्णालयातील कर्मचाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

दिल्लीतील एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेल्या एका 11 वर्षीय मुलीवर रुग्णालयातील कर्मचाऱ्यानेच बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधीत कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.दिल्लीच्या रोहिणी भागातील ईएसआय रुग्णालयात हा प्रकार घडला. या रुग्णालयात साफ सफाईचे काम करणाऱ्या एका व्यक्तीने या मुलीवर बलात्कार केला. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more