Short News

मित्रों चित्रपटातील "चलते चलते", गाणे प्रदर्शित

मित्रों चित्रपटातील "चलते चलते", गाणे प्रदर्शित

बहुप्रतीक्षित 'मित्रों' चित्रपटातील नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. या चित्रपटातील तीन मॅड मित्रांची कथा आपल्या चेहऱ्यावर नक्की हसू आणेल. या चित्रपटातील नवे गाणे प्रदर्शित झाले असून चलते चलते असे या गाण्याचे शीर्षक आहे. जॅकी भागनानी आणि क्रितीका कम्रा या गाण्यात एकमेकांसोबत आपला खास वेळ घालवताना दिसत आहेत. प्रसिद्ध गायक म्हणजेच अतिफ असलमने या गाण्याला सुरेख आवाजाने अधिक खास बनवले आहे. 
गोव्यात भाजप सरकारविरोधात काँग्रेस आणणार अविश्वास ठराव

गोव्यात भाजप सरकारविरोधात काँग्रेस आणणार अविश्वास ठराव

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आजारी असल्यामुळं त्यांच्या जागी नवं नेतृत्व निवडण्याबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही. पर्रिकर यांच्याशी चर्चा करून येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अमित शाह यांनी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, प्रदे्शाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर आणि खासदार नरेंद्र सावईकर या गोव्यातील तिनही खासदारांशी काल दिल्लीत सुमारे अडीच तास चर्चा केली.
सुबोध भावेच्या 'शुभ लग्न सावधान' सिनेमाचा अफलातून ट्रेलर

सुबोध भावेच्या 'शुभ लग्न सावधान' सिनेमाचा अफलातून ट्रेलर

सुबोध भावेसोबत अभिनेत्री श्रुती मराठे स्क्रिन शेअर करणार आहे. ही जोडी 'शुभ लग्न सावधान' या सिनेमाद्वारे ही जोडी पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी या सिनेमातील एक गाणं देखील प्रदर्शित झालं आहे. समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित ‘शुभ लग्न सावधान' या आगामी सिनेमातील या गाण्याला मंगेश कांगणेने शब्दबद्ध केलं.
दुखापतग्रस्त हार्दिकच्या जागी दीपक चहरला मिळणार संधी

दुखापतग्रस्त हार्दिकच्या जागी दीपक चहरला मिळणार संधी

आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध सामन्यात हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाल्यामुळे भारतीय संघाच्या चिंतेत भर पडली होती. हार्दिकच्या पाठीला झालेली दुखापत पाहता बीसीसीआयने संघासाठी आपला बॅकअप प्लान तयार ठेवला आहे. दिपक चहरला हार्दिकच्या जागेवर पर्याय म्हणून दुबईत पाचारण करण्यात आलेलं आहे. सध्या भारतीय संघाचे फिजीओथेरपिस्ट आणि डॉक्टरांची टीम हार्दिक पांड्यावर उपचार करते आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more