Short News

विजय चव्हाणांवरील कुंडलकरांच्या पोस्टला जितेंद्रचं सडेतोड उत्तर

विजय चव्हाणांवरील कुंडलकरांच्या पोस्टला जितेंद्रचं सडेतोड उत्तर

विजय चव्हाण यांच्या निधनानंतर अनेकांनीच त्यांना श्रद्धांजली देत आपले लाडके विजूमामा गल्याचं म्हणज शोक व्यक केला. अशा या दु:खाच्या प्रसंगी दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांची पोस्ट मात्र वादग्रस्त ठरली. विजय चव्हाण आजारी असताना कोणी त्यांची भेट घेण्यासाठी गेलं होतं का, असं म्हणत त्यांनी या कलाकार मंडळींना खोचक सवाल केला. त्याला जितेंद्र जोशीने उत्तर देत तुम्हाला नसलेल सुतक आम्ही पाळल असे म्हटले.
गणेश विसर्जनदरम्यान राज्यात एकूण 24 जणांचा बुडून मृत्यू

गणेश विसर्जनदरम्यान राज्यात एकूण 24 जणांचा बुडून मृत्यू

रविवारी राज्यभर गणेश विसर्जनाचा जल्लोष सुरू असतानाच राज्याच्या काही भागात झालेल्या दुर्घटनांमुळे भक्तांच्या उत्साहावर विरजन पडले. रविवारी गणेश विसर्जनावेळी राज्यात झालेल्या विविध घटनांमध्ये 24 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यात जुन्नर आणि जालन्यातील प्रत्येकी तीन तरुणांचा, तर अमरावती, यवतमाळ आणि भंडाऱ्यात प्रत्येकी दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. 
आत्तापर्यंतचा लाजीरवाणा पराभव  - पाक प्रशिक्षक

आत्तापर्यंतचा लाजीरवाणा पराभव - पाक प्रशिक्षक

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानला दुसऱ्या सामन्यातही धुळ चारली. या पराभवामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंचे मनोबल चांगलेच खचले आहे. संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी रविवारचा पराभव हा आत्तापर्यंतचा लाजीरवाणा पराभव असल्याचे मत व्यक्त केले. तसेच संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये अपयशी होण्याची भिती पसरली असल्याचेही ते म्हणाले. 
प्रियकराच्या मदतीने पत्नीने धावत्या गाडीत केली नवऱ्याची हत्या

प्रियकराच्या मदतीने पत्नीने धावत्या गाडीत केली नवऱ्याची हत्या

 विवाहित महिलेने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची धावत्या गाडीमध्ये गळा आवळून हत्या केली. बंगळुरुत यशवंतपूरमधील बीके नगर येथे ही घटना घडली. ममता असे आरोपी महिलेचे नाव असून ती येलहंका जवळच्या वीरासागरा येथे राहते. दुसऱ्या आरोपीचे नाव अप्पू (24) आहे. ममताने अप्पूच्या मदतीने पती सागाई राजची (30) हत्या केली. ममता आणि अप्पूने सागाई राजला दारु पाजल्यानंतर त्याची धावत्या गाडीमध्ये गळा आवळून हत्या केली.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more