Short News

मराठी नाटकांचा 'फोर्ब्ज'कडून गौरव

मराठी नाटकांचा 'फोर्ब्ज'कडून गौरव

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पत्नी अवली आणि विठ्ठलाची सहचारिणी रुक्मिणी यांच्यामधला भावपूर्ण संवाद रसिकांसमोर मांडणाऱ्या संगीत देवबाभळी या नाटकांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या नाटकाची 'फोर्ब्ज'च्या जगप्रसिद्ध मासिकाने दखल घेतली असून 'भारतामध्ये सर्वाधिक लोकप्रिय होत असलेल्या नाटकांपैकी एक' असा या मासिकात संगीत देवबाभळीचा गौरव करण्यात आला आहे.
पुन्हा सर्जीकल स्ट्राईकवर पहा काय म्हणतात लष्कर प्रमुख

पुन्हा सर्जीकल स्ट्राईकवर पहा काय म्हणतात लष्कर प्रमुख

जम्मू-काश्मीरमधल्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे भारतीय सुरक्षा दलांच्या हाती लागले आहेत. यानंतर भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची गरज व्यक्त केली. यावेळी लष्करप्रमुखांना भारतीय सैन्याकडून पुन्हा सर्जिकल स्ट्राईक केला जाणार का?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सर्जिकल स्ट्राईकचा वापर सरप्राईज म्हणून केला जातो. असं त्यांनी म्हटले.
लालबाग राजाचं गिरगाव चौपाटीला विसर्जन

लालबाग राजाचं गिरगाव चौपाटीला विसर्जन

रविवारी सकाळी ११ वाजता चिवडा गल्लीतून निघालेली लालबागच्या राजाची मिरवणूक तब्बल १९ तासांनी गिरगाव चौपाटीला पोहोचली. सकाळी सहा वाजता राजाची मिरवणूक मोठ्या दिमाखात निघाली. हजारो भक्तांच्या साथीने पहाटे लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. हजारो भाविकांनी जड अंत: करणाने बाप्पाला निरोप देण्यात आला.
मुझफ्फरपूरच्या माजी महापौरांची गोळ्या झाडून हत्या

मुझफ्फरपूरच्या माजी महापौरांची गोळ्या झाडून हत्या

बिहारमधील मुझफ्फरपूर शहराचे माजी महापौर समीर कुमार (वय ५०) आणि त्यांचा चालक रोहित कुमार (४०) यांची अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. हल्लेखोरांनी रायफलीतून एकूण १७ ते १८ फैरी झाडल्याची माहिती उपपोलीस अधीक्षक मुकुल रंजन यांनी दिली आहे. समीर कुमार हे २००२ ते ०७या काळात मुझफ्फरपूरचे महापौर होते. या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीकृष्ण वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठविण्यात आले.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more