Short News

भैयाजी सुपरहिट या सिनेमातून प्रिती झिंटा करणार कमबॅक

भैयाजी सुपरहिट या सिनेमातून प्रिती झिंटा करणार कमबॅक

आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकणारी अभिनेत्री प्रिती झिंटा खूप काळ रुपेरी पडद्यापासून दूर होती. पण आता पुन्हा एकदा प्रिती बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. भैयाजी सुपरहिट या सिनेमातून प्रिती दीर्घ काळानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमात प्रितीसोबत सनी देओल, अमीषा पटेल आणि अरशद वारसी हे कलाकार आहेत. यात प्रिती भैयाजी म्हणजेच सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.
पंतप्रधान मोदी यांना संघाचे समर्थन

पंतप्रधान मोदी यांना संघाचे समर्थन

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी संपूर्ण यंत्रणा तैनात करण्याचा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गुजरातमध्ये झालेल्या एका गुप्त बैठकीत घेतला. माओवादी विरोधी आॅपरेशन यशस्वी झाल्याने, ख्रिश्चन मिशनऱ्यांना उत्तरदायी बनविल्याने आणि जम्मू- काश्मिरात मेहबूबा मुफ्ती सरकारपासून वेगळे झाल्यामुळे आरएसएस नेतृत्व मोदी सरकारवर खूश आहे. अनेक दशकांपासून लढणाºया आरएसएस कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले.
मायकल होल्डिंगचा काळी पट्टी बांधल्यावरून भारतीय टीमवर निशाणा

मायकल होल्डिंगचा काळी पट्टी बांधल्यावरून भारतीय टीमवर निशाणा

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचं निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली म्हणून भारतीय खेळाडूंनी काळी पट्टी बांधली. पण भारतीय खेळाडूंनी काळी पट्टी बांधल्यावरून वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू मायकल होल्डिंग यांनी उपहासात्मक वक्तव्य केलं आहे. सीरिजमध्ये ०-२नं पिछाडीवर असल्यामुळे भारतीय खेळाडूंनी काळ्या पट्ट्या बांधलेल्या नाहीत, असं होल्डिंग म्हणाले.
अटलबिहारी वाजपेयींच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होता डेव्हिड हेडलीचा भाऊ

अटलबिहारी वाजपेयींच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होता डेव्हिड हेडलीचा भाऊ

अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानहून आलेल्या शिष्टमंडळात मुंबई २६/११ दहशतवादी हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडलीचा भाऊ दानयाल गिलानीदेखील सहभागी होते. मिळालेल्या माहितीनुसार, वाजपेयींच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचे कायदा आणि माहिती मंत्री अली जाफर १७ ऑगस्टला भारतात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत आलेल्या तीन अधिकाऱ्यांपैकी एक दानयाल गिलानी होते.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more