Short News

सलमान-कॅटरिनाच्या 'भारत' सिनेमाचा लूक आला समोर

सलमान-कॅटरिनाच्या 'भारत' सिनेमाचा लूक आला समोर

सलमान खानचा आगामी सिनेमा भारत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाची शूटींग सुरु आहे. माल्टामध्ये सिनेमाचं शूटींगसाठी सुरु आहे. सलमान भारत सिनेमाच्या शूटिंगसाठी माल्टाला गेला आहे. सलमान खानने काही दिवसांपूर्वीच सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला आहे. पण यामध्ये सलमान खान दिसला नव्हता. कॅटरिनाने देखील माल्टामध्ये सलमानसोबत शूटींगला सुरुवात केली आहे. कॅटरिनाने एक फोटो देखील शेअर केला आहे.
फर्निचर दुकानाला आग, अग्निशामक दलाचा भोंगळ कारभार उघड

फर्निचर दुकानाला आग, अग्निशामक दलाचा भोंगळ कारभार उघड

सटाणा रस्त्यावरील असलेल्या फर्निचर दुकानाला सकाळी आग लागली. या आगीत 50 लाखांचे फर्निचर जळून खाक झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हे दुकान हाझी युसुफ सय्यद जावेद यांचे आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. परंतु आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाने अप्रशिक्षित जवानांना पाठवले. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 
विमानात एअर होस्टेसला केलं त्यांन प्रपोझ
<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/8Nav9tBWPv4" frameborder="0" allow="autoplay; encrypted-media" allowfullscreen></iframe>

विमानात एअर होस्टेसला केलं त्यांन प्रपोझ

चीनमध्ये एका एअर होस्टेसचा बॉयफ्रेंड तिला लग्नासाठी प्रपोज करण्यासाठी फ्लाइटमध्ये चढला. फ्लाइट उडण्याच्या अर्धा तास अगोदर तो गर्लफ्रेंडजवळ गेला आणि गुडघ्यावर बसून लग्नासाठी प्रपोज केलं. एवढंच नाही तर एअर होस्टेसने देखील बॉयफ्रेंडला निराश नाही केला आणि प्रपोज स्विकारलं. या दोघांच नातं जवळपास 1 महिन्यापासून होतं. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 
रोहित शर्माला पाकिस्तानविरुद्ध विक्रमाची संधी, 'या' खेळाडूला टाकणार मागे

रोहित शर्माला पाकिस्तानविरुद्ध विक्रमाची संधी, 'या' खेळाडूला टाकणार मागे

आज भारतीय खेळाडूंना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना करायचा  आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माला एक विक्रम खुणावत आहे. आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा भारतीय खेळाडूचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराटने आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांत 206 धावा केल्या आहेत. विराटचा हा विक्रम मोडण्यासाठी रोहितला अवघ्या तीन धावांची आवश्यकता आहे. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more