Short News

प्रेक्षकांना चाव लावणारे 'सुई धागा' चे  पहिले गाणे प्रदर्शित

प्रेक्षकांना चाव लावणारे 'सुई धागा' चे पहिले गाणे प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अनुष्का शर्माच्या 'सुई धागा' चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे 'चाव लागा' हे पहिले गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. 'चाव लागा' हे गाणे 3 मिनिटाचे असून वरुण ग्रोवरने हे गाणे लिहिले असून अनु मलिकने संगीत दिले आहे. पॅपोन आणि रोनिकी गुप्ता यांनी गाण्याला आवाज दिला आहे. या गाण्यात वरुण आणि अनुष्काची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.   
शतकी खेळीसाठी शिखरला पहावी लागली सात महिने वाट

शतकी खेळीसाठी शिखरला पहावी लागली सात महिने वाट

भारत विरुद्ध हाँगकाँगच्या सामन्यात भारताने हाँगकाँगवर निसटता विजय मिळवला. या सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवनने 120 चेंडूत 127 धावा केल्या. या खेळीत त्यांने 15 चौकार आणि 2 षटकारांची आतषबाजी केली. मात्र ही शतकी खेळी साकरण्यासाठी शिखर धवनला तब्बल सात महिने वाट पहावी लागली. त्याने १० फेब्रुवारी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १०९ धावा केल्या होत्या. 
मुस्लीमांना स्वीकारणे हेही हिंदुत्वच ! सरसंघचालक मोहन भागवत यांचे विचार

मुस्लीमांना स्वीकारणे हेही हिंदुत्वच ! सरसंघचालक मोहन भागवत यांचे विचार

हिंदुत्व म्हणजे समावेशकता आणि मुस्लीमांना आपले मानणे हा त्याचाच एक भाग आहे. हिंदू राष्ट्र म्हणजे तेथे मुस्लीमांना जागा नाही, असा होत नाही. जर आपण मुस्लीमांना स्वीकारत नसू तर ते हिंदुत्व नाही. हिंदुत्व हे भारतीयत्व आणि सर्वसमावेशकता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. ‘हिंदुत्व' असा शब्द वापरायचा नसेल तर नका वापरू, ‘भारतीय' म्हणा. असेही त्यांनी म्हटले.
वाहतुकीचे नियम मोडल्याचा जाब विचारणे पडले महागात, मारहाणीत तरूणाचा मृत्यू

वाहतुकीचे नियम मोडल्याचा जाब विचारणे पडले महागात, मारहाणीत तरूणाचा मृत्यू

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना जाब विचारणे मुंबईच्या एका तरुणाच्या जिवावर बेतले आहे. संपत सोनावणे असे मृत तरुणाचे नाव असून मुंबईच्या कुर्ला इथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. संपत हे ठक्कर बाप्पा कॉलनीतून घरी जात असताना दोन दुचाकीस्वार विरुद्ध दिशेन येत होते. संपत यांनी त्यांना जाब विचारला असता त्या दोघांनी मारहाण केली. या मारहाणीत संपत यांच्या डोक्याला दखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more