Short News

'या' कारणामुळे क्रिती सेनन आणि सुशांत सिंग राजपूतचे झाले ब्रेकअप

'या' कारणामुळे क्रिती सेनन आणि सुशांत सिंग राजपूतचे झाले ब्रेकअप

'एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' आणि 'पीके' सारखे हिट चित्रपट देणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे अभिनेत्री क्रिती सेनन आणि सुशांतचे ब्रेकअप झाले असल्याची चर्चा आता सर्वत्र सुरु आहे. सूत्रांनुसार, क्रितीला आता या रिलेशनशिपमध्ये जराही रस नसल्याचे समजतेय. त्यामुळे तिने हे रिलेशन संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
पेट्रोल आणि डिझेलनंतर आता सीएनजीच्या दरात देखील होणार वाढ

पेट्रोल आणि डिझेलनंतर आता सीएनजीच्या दरात देखील होणार वाढ

डॉलरच्या तुलनेत घसरत असलेल्या रुपयांचा परिणाम इंधनाच्या दरावर होऊ लागला आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडत असताना सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. घरगुती वापरासाठी असलेल्या पीएनजी गॅसच्या दराची किंमत ऑक्टोबर महिन्यात ठरवण्यात येणार आहे. देशांतर्गत गॅसच्या बेस प्राइजमध्ये प्रति युनिट १४ टक्के म्हणजे ३.५ डॉलरने (जवळपास २५२ रुपये) वाढ होण्याचा अंदाज आहे.
देशाचे भविष्य कसे घडेल?, हे राम मंदिराच्या स्वप्नासारखे अधांतरी लटकू नये - उद्धव ठाकरे

देशाचे भविष्य कसे घडेल?, हे राम मंदिराच्या स्वप्नासारखे अधांतरी लटकू नये - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर, कलम 370, गोवंश कायदा या मुद्यावरुन त्यांनी भाजपावर निशाणा साधला. ''सरसंघचालकांची मंदिरप्रश्नी भूमिका सचोटीची आहे, पण राज्यकर्त्यांच्या अंतरंगात त्या सचोटीचा अंश उरला आहे काय? अमित शहा हे अत्यंत आत्मविश्वासाने सांगतात की, देशात पन्नास वर्षे भाजपचेच राज्य राहील, पण 370 कलम रद्द करू किंवा राम मंदिर नक्की कधी बांधू यावर ते बोलत नाहीत.
जेट एअरवेजच्या प्रवाशाने मागितली 30 लाखाची भरपाई

जेट एअरवेजच्या प्रवाशाने मागितली 30 लाखाची भरपाई

मुंबईहून जयपूरला जाणाऱ्या जेट एअरवेजच्या उड्डाणादरम्यान चालक दलातर्फे 'केबिन प्रेशर' नियंत्रित न केल्याने प्रवाशांच्या नाक-कानातून रक्त वाहून अनेक प्रवासी आजारी पडले होते. यातील एका प्रवाशाने जेट एअरवेजकडे 30 लाख रुपयांची मागणी केली आहे. यासोबतच 100 अपग्रेड वाऊचरदेखील मागितले आहेत. एअरलाईन्सवर लक्ष न ठेवल्याचा आरोप चालक दलावर केलायं.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more