Short News

सोशल मीडिया वापराता मग, ‘टेक केअर गुड नाइट’ चा ट्रेलर पाहा

सोशल मीडिया वापराता मग, ‘टेक केअर गुड नाइट’ चा ट्रेलर पाहा

सायबर क्राइमवर भाष्य करणाऱ्या आगामी ‘टेक केअर गुड नाइट' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्ण पेठे यांच्या मुख्य भूमिका आहेत.  सत्य घटनांवर आधारित हा चित्रपट आहे. 31 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सायबर क्राईमवर आधारित असलेला या चित्रपटात एका कुटुंबाची कथा दाखवली आहे.
देशव्यापी अभियानातून ‘स्वच्छाग्रही’ तयार: पंतप्रधान मोदी

देशव्यापी अभियानातून ‘स्वच्छाग्रही’ तयार: पंतप्रधान मोदी

भारतात राबवलेल्या स्वच्छता अभियानामुळे आज देशातील लाखो बालके निरोगी आयुष्य जगत आहेत. आपल्या या मोहिमेचे जागतिक आरोग्य संघटनेनेही कौतुक केले. महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी देशात सत्याग्रही तयार केले. या सत्याग्रहींनी देशाच्या स्वातंत्र्यात मोठे योगदान दिले. आज महात्मा गांधींच्या प्रेरणेतून आम्ही स्वच्छाग्रही तयार केले आहेत. असे मोदी म्हणाले. 
परखडपणे मत मांडणाऱ्या 'मंटो' चा जबरदस्त ट्रेलर

परखडपणे मत मांडणाऱ्या 'मंटो' चा जबरदस्त ट्रेलर

अखेर ज्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहिली जात होती तो ट्रेलर लाँच झाला. अभिनेत्री - फिल्ममेकर नंदिता दासने मंटो या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. नवाजुद्दीनच्या मंटोचा ट्रेलर अगदी जबरदस्त आहे. या सिनेमातून आपल्याला लेखक मंटो यांच्या जीवनाची ओळख करून दिली आहे. या ट्रेलरमध्ये बॉलिवूडचे दिग्गज लेखक जावेद अख्तर हे वकिल म्हणून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 
'भारत' चित्रपटात नोराचीही लागली वर्णी

'भारत' चित्रपटात नोराचीही लागली वर्णी

बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा आगामी चित्रपट 'भारत'बद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता वाढली आहे.अभिनेत्री दिशा पटानी या चित्रपटात हेलन यांच्या रुपात दिसणार असल्याचे सूत्रांकडून समजले होते. त्यानंतर आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री नोरा फतेहीची या चित्रपटात वर्णी लागली आहे. नोराला पहिल्यांदाच बिग बजेट चित्रपटात झळकण्याची संधी मिळाल्यामुळे नुकतेच तिने याविषयी तिचे मत व्यक्त केले आहे. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more