Short News

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण रुग्णालयात दाखल

आपल्या अभिनयाने विजय चव्हाण यांनी अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवली आहे. त्यांच्या चित्रपट, नाटकातील अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. मोरूची मावशी या नाटकात त्यांनी अतिशय ताकदीने स्त्री पात्र रंगवलेले होते. ते गेल्या कित्येक दिवसांपासून आजारी आहेत. दरम्यानच्या काळात त्यांची तब्येत चांगलीच सुधारली होती. पण आता पुन्हा एकदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
शासनाने सरकारी हॉस्पिटलचे थकवले 90 कोटी

शासनाने सरकारी हॉस्पिटलचे थकवले 90 कोटी

सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जाणा-या रूग्णांनो जरा सावधान. कारण सरकारी हॉस्पिटलमध्ये होणा-या शस्त्रक्रियेच्या उपकरणांचा आणि जीवरक्षक औषधांचा पुरवठा थांबणार आहे. ऑल इंडिया फुड ड्रग लायसन होल्डर फाऊंडेशननं हा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेसाठी लागणा-या साहित्य, औषधं यांच्या उत्पादकांचे आणि पुरवठादारांचे 90 कोटी रुपये 2015 पासून महाराष्ट्र शासनाकडे थकलेत. 
'आरे'तील मेट्रो 3 कारशेडला राष्ट्रीय हरित लवादाचा हिरवा कंदील

'आरे'तील मेट्रो 3 कारशेडला राष्ट्रीय हरित लवादाचा हिरवा कंदील

आरे कॉलनीमधील मुंबई मेट्रो3 च्या कारशेडबाबत सर्व कायदेशीर अडचणी दूर झाल्या आहेत. काही सामाजिक संस्थांनी हरित लवादात कारशेड विरोधात याचिक केली होती. मात्र अंतिम निर्णयात या याचिक रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आरे कॉलनीत मेट्रो 3 साठी कारशेड बांधण्याला हिरवा कंदील मिळाला आहे. या निर्णयामुळे लवकरच आरे कॉलनीत प्रकल्पाच्या जागेत असणारी झाडे तोडणं, भराव टाकणे , डेब्रिज टाकणे ही कामे सुरु होतील. 
चैन आणि प्रेयसीला फिरवण्यासाठी दुचाकीची चोरी, दोघे अटकेत

चैन आणि प्रेयसीला फिरवण्यासाठी दुचाकीची चोरी, दोघे अटकेत

चैन करण्यासाठी आणि गर्लफ्रेण्डला फिरविण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या दोघांना सांगली पोलिसांनी अटक केली आहे. दोघांकडून तब्बल 6 लाख रुपये किंमतीच्या 12 मोटार सायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. साहिल मौला पटेल(21) आणि दगडू रामा कुकडे(19) अशी आरोपींची नावे असून हे दोघेही महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत आहेत. प्रेयसीला फिरविण्यासाठी आणि चैन करण्यासाठी साहिल पटेलकडे पैसे नसायचे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more