India Short News

गुजरात निवडणुकीपूर्वी राहुल गांधी स्वीकारणार पक्ष अध्याक्षाची जबाबदारी

गुजरात निवडणुकीपूर्वी राहुल गांधी स्वीकारणार पक्ष अध्याक्षाची जबाबदारी

राहुल गांधी लवकरच काँग्रेस पक्षाची सूत्रे स्वीकारण्याची शक्यता आहे. राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कधी विराजमान होणार,हा प्रश्न सातत्याने विचारला जातो.

याबद्दल अनेकदा चर्चा आणि शक्यताही व्यक्त झाल्या.मात्र आता या सगळ्याला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.सोनिया गांधी यांनी सोमवारी दिल्लीत काँग्रेस पक्षातील अंतर्गत निवडणुकांचे वेळापत्रक निश्चित करण्यासाठी बैठक बोलावली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये ६ दहशतवाद्यांचा खात्मा, १ जवान शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये ६ दहशतवाद्यांचा खात्मा, १ जवान शहीद

जम्मू- काश्मीरमधील बांदिपोरा येथे सुरक्षा दलांनी ६दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या चकमकीत सुरक्षा दलातील एक जवान शहीद झाला असून दोन जवान यात जखमी झाले.
बांदिपोरा येथील हाजिन परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानुसार कमांडो पथकातील जवान आणि जम्मू- काश्मीर पोलिसांच्या पथकाने परिसरात संयुक्त शोधमोहीम सुरु केली.

मुंबईकरांनो सावधान ! मुंबई बुडतेय...

मुंबईकरांनो सावधान ! मुंबई बुडतेय...

नासाच्या एका रिपोर्टनुसार मुंबई आणि कर्नाटकातील मंगरुळ या दोन शहरांना बुडण्याचा धोका आहे. हिमनग आणि जमिनीवरचं बर्फ मोठया प्रमाणात वितळत असल्यामुळे हा धोका निर्माण झाला आहे.
जगभरातील धोका असलेल्या शहरांची यादी यात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात मुंबई आणि कर्नाटकातील मंगरुळ या दोन शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

जीएसटी कमी झाल्यानंतरही ग्राहकांना लुटणा-या हॉटेल्सवर होणार कारवाई

जीएसटी कमी झाल्यानंतरही ग्राहकांना लुटणा-या हॉटेल्सवर होणार कारवाई

जीएसटी दर कमी केल्यानंतरही हॉटेल्सकडून मात्र दर कमी करण्यात आले नसल्याने सरकार कारवाई करण्याच्या तयारीत आहे. दर जसेच्या तशे ठेवून ग्राहकांची फसवणूक करत लुबाडणा-या हॉटेल्सवर नफाखोरी विरोधी तरतुदीअंतर्गत कारवाई होणार.

जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्के केल्याने आणि इनपुट टॅक्स क्रेडिट बंद करण्याच्या जीएसटी काऊन्सिलच्या निर्णयामुळे दर वाढवले.