Short News

राहुल गांधींना फक्त डोळाच  मारता येतो : अनिल विज

राहुल गांधींना फक्त डोळाच मारता येतो : अनिल विज

भाजपचे कॅबिनेटमंत्री अनिल विज यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींना इतिहासाची जाण फार कमी आहे. त्यांना कुठल्याही गोष्टींची माहिती नाही. केवळ डोळा कसा मारावा एवढेच त्यांना माहित आहे, असे विज यांनी म्हटले आहे. ते अंबाला येथे बोलत होते.राहुल गांधी यांनी देशातील महिलांच्या स्थितीसंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते. यावर उत्तर देताना त्यांनी टीका केली 
'इम्रान खान यांनी एक पाऊल पुढे टाकावे, आम्ही शंभर पावले टाकू'

'इम्रान खान यांनी एक पाऊल पुढे टाकावे, आम्ही शंभर पावले टाकू'

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात 14 जून रोजी दहशतवाद्यांनी 44 राष्ट्रीय रायफल्सचा जवान औरंगजेबचे अपहरण करुन त्यांची हत्या केली होती. त्याच शहीद औरंगजेबच्या वडिलांनी भारत-पाक शांततेसाठी दोन्ही देशांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आपण एक पाऊल पुढे टाका आम्ही शंभर पावले टाकू असे आवाहनही केले आहे. 
Asian Games 2018 : महिला कुस्तीपटू दिव्या काकरानला कांस्यपदक

Asian Games 2018 : महिला कुस्तीपटू दिव्या काकरानला कांस्यपदक

भारताची महिला कुस्तीपटू दिव्या काकरानने आशिया क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी कांस्यपदकाची कमाई केली आहे. दिव्याने 68 किलो वजनीगटात तैवानच्या चेन वेनलिंगला 10-0 असे पराभूत करत कांस्यपदक पटकावले. भारतासाठी हे आतापर्यंतचे चौथे कांस्यपदक आहे. काल भारताच्या महिला कुस्तीपटू विनेश फोगटने सुवर्णपदकाची कमाई केली होती. आशिया क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकुण दहा पदकांची कमाई केली आहे. 
इराणने तयार केले स्वतःचे स्वदेशी फायटर जेट

इराणने तयार केले स्वतःचे स्वदेशी फायटर जेट

इराणने देशांतर्गतच फायटर जेट बनवले असून त्याचे प्रदर्शनही मंगळवारी करण्यात आले. इराणच्या नॅशनल डिफेन्स इंडस्ट्री एक्झिबिशनच्या कार्यक्रमात कोव्सर हे विमान प्रदर्शित करण्यात आले. यावेळेस इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी कोव्सरच्या कॉकपिटमध्ये बसल्याचा फोटोही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. हे विमान 100 टक्के इराणमध्ये तयार करण्यात आले असून ते फोर्थ जनरेशन फायटर विमान आहे. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more