Short News

पूरग्रस्तांना अॅपलची 7 कोटी तर बिल गेट्स यांची 4 कोटींची मदत

पूरग्रस्तांना अॅपलची 7 कोटी तर बिल गेट्स यांची 4 कोटींची मदत

केरळमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे तेथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. यामध्ये अनेकांचे जीव गेले असून असंख्य लोक बेघर झाले आहेत. जगभरातून केरळसाठी मदतीचा ओघ सुरु असताना त्यामध्ये आता आणखी एक मोठी भर पडली आहे. अॅपल या अमेरिकन कंपनीने केरळमधील पूरग्रस्तांना 7 कोटी रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. घरे, शाळा यांच्या पुर्नबांधणीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला हा निधी दिला आहे.
आत्तापर्यंतचा लाजीरवाणा पराभव  - पाक प्रशिक्षक

आत्तापर्यंतचा लाजीरवाणा पराभव - पाक प्रशिक्षक

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानला दुसऱ्या सामन्यातही धुळ चारली. या पराभवामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंचे मनोबल चांगलेच खचले आहे. संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी रविवारचा पराभव हा आत्तापर्यंतचा लाजीरवाणा पराभव असल्याचे मत व्यक्त केले. तसेच संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये अपयशी होण्याची भिती पसरली असल्याचेही ते म्हणाले. 
प्रियकराच्या मदतीने पत्नीने धावत्या गाडीत केली नवऱ्याची हत्या

प्रियकराच्या मदतीने पत्नीने धावत्या गाडीत केली नवऱ्याची हत्या

 विवाहित महिलेने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची धावत्या गाडीमध्ये गळा आवळून हत्या केली. बंगळुरुत यशवंतपूरमधील बीके नगर येथे ही घटना घडली. ममता असे आरोपी महिलेचे नाव असून ती येलहंका जवळच्या वीरासागरा येथे राहते. दुसऱ्या आरोपीचे नाव अप्पू (24) आहे. ममताने अप्पूच्या मदतीने पती सागाई राजची (30) हत्या केली. ममता आणि अप्पूने सागाई राजला दारु पाजल्यानंतर त्याची धावत्या गाडीमध्ये गळा आवळून हत्या केली.
गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण केल्याने 202 मंडळांवर गुन्हे दाखल

गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण केल्याने 202 मंडळांवर गुन्हे दाखल

गणेशोत्सव काळात उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता आवाजाची मर्यादा न पाळणाऱ्या मंडळावर कारवाई होणार आहे. मुंबई पोलिसांनी या मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत. संबंध मुंबईत ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी एकूण 202 गणेशोत्सव मंडळावर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त मंजुनाथ सिंगे यांनी दिली. 65 ते 70 डेसिबलपेक्षा अधिक आवाज करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्यात आली आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more