Short News

राम रहीमची देश-विदेशातील कोट्यवधींची प्रॉपर्टी उघड

राम रहीमची देश-विदेशातील कोट्यवधींची प्रॉपर्टी उघड

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) डेराप्रमुख गुरमीत राम रहीमची खास राहिलेल्या हनीप्रीतची डायरी डी-कोड करण्यात यश मिळवले आहे. यात डेरा सच्चा सौदाशी निगडित देश-विदेशातील कोट्यवधींच्या संपत्तीचा खुलासा झाला आहे. गतवर्षी सप्टेंबरमध्ये पोलिसांनी हनीप्रीतजवळून ही डायरी हस्तगत केली होती. ती डी-कोड करण्यात ईडीला 11 महिन्यांचा काळ लागला. गुरमीत राम रहीम साध्वींच्या लैंगिक शोषणाप्रकरणी 20  शिक्षा भोगत आहे.  
1 ऑक्टोबरला होणार बांबू शेती कार्यशाळा

1 ऑक्टोबरला होणार बांबू शेती कार्यशाळा

राष्ट्रीय बांबू अभियानांतर्गत ग्रामीण भागात बांबू शेतीला प्रोत्साहन मिळून खासगी जमिनीवर बांबू लागवड वाढावी, यासाठी जळगाव येथे कार्यशाळा घेतली जाणार आहे. 1 ऑक्टोबर रोजी ही कार्यशाळा होणार असून मुख्यमंत्री  फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत. नॅशनल बांबू मिशन कार्यकारी समितीचे अध्यक्ष एम.के.पाटील हे उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकरांनी दिली. 
पत्नीसह व्हिडिओ कॉलवरुन बोलताना पतीची आत्महत्या

पत्नीसह व्हिडिओ कॉलवरुन बोलताना पतीची आत्महत्या

पत्नीसोबत व्हिडिओ कॉलवरुन बोलत असताना एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मध्यप्रदेशात इंदूरमधील एरोड्रम भागात रविवारी रात्री ही घटना घडली. रणजीत (32) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कौटुंबिक वादामुळे पत्नी तिच्या माहेरी बिहारला निघून गेल्यामुळे रणजीत खचला होता. रविवारी रात्री पत्नीसोबत व्हिडिओ कॉलवरुन बोलत असताना त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले.
भारताचे हाँगकाँगपुढे 286 धावांचे आव्हान

भारताचे हाँगकाँगपुढे 286 धावांचे आव्हान

हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात भारताने निर्धारित 50 षटकात 7 बाद 285 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून शिखर धवन याने गब्बर खेळी करत शतक ठोकले. त्याने 120 चेंडूत 127 धावा केल्या. या खेळीत त्याने 15 चौकार आणि 2 षटकारांची आतषबाजी केली. अंबाती रायडूनेही अर्धशतक झळकावले. हाँगकाँगकडून किंचित शाहने सर्वाधिक 3 बळी टिपले.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more