Short News

मुंबई शेअर बाजारात 'अमरावती' रोखे दाखल; चंद्राबाबू नायडूंनी केले उद्घाटन

मुंबई शेअर बाजारात 'अमरावती' रोखे दाखल; चंद्राबाबू नायडूंनी केले उद्घाटन

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मुंबईच्या शेअर मार्केटमध्ये 'अमरावती' रोख्यांच्या विक्रीचे उद्घाटन केले. मुंबई शेअर बाजारात 'अमरावती' रोख्यांची नोंदणी करण्यात आली आहे. यावेळी मुंबई शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार, आंध्रप्रदेशचे वित्तमंत्री यनामाला रामकृष्णन, डॉ. पी. नारायणा यांची उपस्थिती होती.
थरारानंतर भारत आणि अफगाणिस्तामधील सामना टाय

थरारानंतर भारत आणि अफगाणिस्तामधील सामना टाय

शेवटच्या षटकापर्यंत रंगलेली भारत आणि अफगाणिस्तानमधील लढत अखेर टाय झाली. सलामीवीर लोकेश राहुल आणि अंबाती रायुडू यांनी केलेल्या शतकी भागीदारीनंतर अफगाणिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर भारताची फलंदाजी कोलमडली. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी 7 धावांची गरज होती. तर अफगाणिस्तानला एका विकेटची गरज होती. अशा परिस्थितीत रवींद्र जडेजाने षटकातील दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकत भारताच्या विजयाची आशा पल्लवित केली.
मोहम्मद शहजादचे शानदार शतक, अफगाणिस्तानचे भारतासमोर 253 धावांचे लक्ष्य

मोहम्मद शहजादचे शानदार शतक, अफगाणिस्तानचे भारतासमोर 253 धावांचे लक्ष्य

आशिया कप स्पर्धेतील आजच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या मोहम्मद शहजादने शानदार शतकीय पारी खेळत अफगाणिस्तानचा डाव सांभाळला आहे. एकीकडे सर्व विकेट पडत असताना शहजाद भारतीय गोलंदाजांची धुलाई करत होता. त्यांने 116 चेंडूत 11 चौकार आणि 7 षटकाराच्या जोरावर 124 धावा केल्या. त्याला मोहम्मद नबीने अर्धशतकीय पारी खेळत चांगली साथ दिली. या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर अफगाण टीमने 50 षटकांत 252 धावा केल्या.
आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय

आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय

दीर्घ काळापासून चर्चेचा विषय असलेल्या आधार कार्डच्या वैधानिकतेवरून सर्वोच्च न्यायालय बुधवारी आपला निर्णय देणार आहे. आधारच्या वैधानिकतेला आव्हान देणाऱ्या २७ याचिकांवर सुमारे चार महिन्यांपासून सुनावणी सुरु होती. मॅरेथॉन चर्चेनंतर सर्वोच्च न्यायालयाने मे मध्ये निर्णय सुरक्षित ठेवला होता. या प्रकरणाची सुनावणी जानेवारीमध्ये सुरु झाली होती. त्यानंतर सुमारे ३८ दिवस याप्रकरणी सुनावणी चालली
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more