Short News

चाइल्ड हेल्पलाइनला ३ वर्षात ३.४ कोटी कॉल्स

चाइल्ड हेल्पलाइनला ३ वर्षात ३.४ कोटी कॉल्स

चाइल्ड हेल्पलाइनला एप्रिल २०१५ पासून यावर्षीच्या मार्च महिन्यांपर्यंत ३.४ कोटींहून अधिक कॉल्स आले आहेत. यामध्ये जवळपास १.३६ कोटी फोन कॉल्स हे सायलेंट कॉल्स होते, अशी माहिती आता समोर आली आहे. या कॉल्समध्ये बॅकग्राऊंडचा आवाज येत होता. काही वेळा कॉल करणारा शांत बसायचा. त्याला वाटणारी भीती, त्याच्यावर असणारे दडपण, त्याची मानसिकता या सर्वांना झुगारुन त्यानं चाइल्ड हेल्पलाइनला फोन केल्याचे समोर आले.
मोहम्मद शहजादचे शानदार शतक, अफगाणिस्तानचे भारतासमोर 253 धावांचे लक्ष्य

मोहम्मद शहजादचे शानदार शतक, अफगाणिस्तानचे भारतासमोर 253 धावांचे लक्ष्य

आशिया कप स्पर्धेतील आजच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या मोहम्मद शहजादने शानदार शतकीय पारी खेळत अफगाणिस्तानचा डाव सांभाळला आहे. एकीकडे सर्व विकेट पडत असताना शहजाद भारतीय गोलंदाजांची धुलाई करत होता. त्यांने 116 चेंडूत 11 चौकार आणि 7 षटकाराच्या जोरावर 124 धावा केल्या. त्याला मोहम्मद नबीने अर्धशतकीय पारी खेळत चांगली साथ दिली. या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर अफगाण टीमने 50 षटकांत 252 धावा केल्या.
आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय

आधार कार्डच्या वैधतेवर उद्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय

दीर्घ काळापासून चर्चेचा विषय असलेल्या आधार कार्डच्या वैधानिकतेवरून सर्वोच्च न्यायालय बुधवारी आपला निर्णय देणार आहे. आधारच्या वैधानिकतेला आव्हान देणाऱ्या २७ याचिकांवर सुमारे चार महिन्यांपासून सुनावणी सुरु होती. मॅरेथॉन चर्चेनंतर सर्वोच्च न्यायालयाने मे मध्ये निर्णय सुरक्षित ठेवला होता. या प्रकरणाची सुनावणी जानेवारीमध्ये सुरु झाली होती. त्यानंतर सुमारे ३८ दिवस याप्रकरणी सुनावणी चालली
नारायण राणेंच्या कट्टर समर्थक आमदाराचे भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत

नारायण राणेंच्या कट्टर समर्थक आमदाराचे भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत

स्वतःच्या पोस्टरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावणारे काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी आता भाजपा प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिलेत. मुख्यमंत्री आपल्या मतदारसंघातले प्रश्न सोडवत असतील, तर त्यांचे आभार मानण्यात गुन्हा तो काय? असा उलटप्रश्न त्यांनी विचारलाय. बीडीडी चाळ पुनर्विकास भूमीपूजनाच्या व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांसोबत असल्यामुळं काँग्रेसच्या होर्डिंगवरून आपले फोटो काढून टाकले.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more