Short News

योगी आदित्यनाथांच्या ३ वैमानिकांचा तडकाफडकी राजीनामा

योगी आदित्यनाथांच्या ३ वैमानिकांचा तडकाफडकी राजीनामा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या तीन पायलट यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पगारवाढीची मागणी पूर्ण न झाल्याने नागरिक उड्डान विभागाच्या ती संविदा पायलटांनी राजिनामा दिला. युपी सरकारने हे राजिनामे सशर्त स्वीकारही केले. यापैकी दोन पायलट सप्टेंबर तर एक पायलट ऑक्टोबरमध्ये रिलीज होईल.
‘राफेल डीलसाठी भारताने रिलायन्सचा प्रस्ताव दिला होता’; फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींचा गौप्यस्फोट

‘राफेल डीलसाठी भारताने रिलायन्सचा प्रस्ताव दिला होता’; फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींचा गौप्यस्फोट

राफेल डीलवरुन देशात सध्या घमासान सुरु असताना आता यात फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांच्या खुलाशाने नवे वळण मिळाले आहे. ओलांद यांनी फ्रान्समधील एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, भारत सरकारने आमच्याकडे अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीशी व्यवहार करण्याची शिफारस केली होती. त्यामुळे आमच्याकडे कुठलाही पर्याय शिल्लक नव्हता.
मुंबईत पेट्रोलचादर 11 पैशांनी वाढला, पेट्रोलचा आजचा दर 89.80 रुपये लिटर

मुंबईत पेट्रोलचादर 11 पैशांनी वाढला, पेट्रोलचा आजचा दर 89.80 रुपये लिटर

मुंबईत पेट्रोलचा दर 11 पैशांनी वाढला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पेट्रोलसाठी 89.80 रुपये मोजावे लागणार आहेत. तर सलग चौथ्या दिवशी डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे डिझेलचा दर 78.42 रुपयांवर स्थिर आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 12 पैशांनी वाढला आहे. एक लिटर पेट्रोलसाठी 82.44 रुपये मोजावे लागतील. दिल्लीतही डिझेलचे दर वाढलेले नाहीत. दिल्लीत डिझेलचा दर 73.87 रुपये इतका आहे.
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची नेपाळमध्ये गोळ्या घालून हत्या

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी खुर्शीद आलम याची गुरुवारी रात्री नेपाळच्या सुनसारी जिल्ह्य़ातील हरिनगर परिसरात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे. खुर्शीद आलम याच्यावर दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी बेछूट गोळीबार केला. या दुचाकीची नंबरप्लेट भारतीय असल्याची माहिती मिळाली आहे. आरोपीची हत्या करण्यात आल्यानंतर हल्लेखोर भारतात पसार झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more