Short News

करुणानिधी यांचे पार्थिव राजाजी हॉलमध्ये, अंत्यदर्शनासाठी गर्दी

करुणानिधी यांचे पार्थिव राजाजी हॉलमध्ये, अंत्यदर्शनासाठी गर्दी

तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे नेते मुथुवेल करुणानिधी यांचे पार्थिव बुधवारी सकाळी चेन्नईतील राजाजी हॉल येथे नेण्यात आले. राजाजी हॉल येथे कार्यकर्त्यांना पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार असून शोकाकुल अवस्थेतील हजारो समर्थकांनी हॉलबाहेर रांगा लावल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही सकाळी दहाच्या सुमारास अंत्यदर्शनासाठी चेन्नईत पोहोचतील.
गांगुलीच्या बॅटवर अटलजींनी लिहिला होता 'हा'  भावनिक संदेश

गांगुलीच्या बॅटवर अटलजींनी लिहिला होता 'हा' भावनिक संदेश

अटलबिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा भारत आणि पाकिस्तानातील संबंध सुधारण्यावरही त्यांनी भर दिला.त्याचवेळी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार होता. दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघाने वाजपेयी यांची भेट घेतली होती. त्यावेळी वाजपेयी यांनी भारताचा कर्णधार सौरव गांगुलीला एक बॅट भेट म्हणून दिली. या बॅटवर वाजपेयींनी 'खेल ही नहीं, दिल भी जीतिए। शुभकामनाएं',असा संदेश लिहिला होता. 
त्रिपुराच्या राज्यपालांनी 'त्या' ट्विटबद्दल मागितली माफी

त्रिपुराच्या राज्यपालांनी 'त्या' ट्विटबद्दल मागितली माफी

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. त्यांच्यावर दिल्लीतीलएम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाजपेयी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी देशभरात प्रार्थना सुरू असताना त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांना ट्विट करुन श्रद्धांजली वाहिली. मात्र काही वेळातच रॉय यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आणि मग त्यांनी ट्विट डिलीट करुन माफी मागितली.
..यामुळे केजरीवाल यांचा वाढदिवस साजरा करण्यास नकार

..यामुळे केजरीवाल यांचा वाढदिवस साजरा करण्यास नकार

आप पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.आज केजरीवाल यांचा 50वा वाढदिवस आहे. भारताचे माजी पंतप्रधान आजारी असताना केजरीवाल यांना आपला वाढदिवस साजरा करणे योग्य वाटले नाही. काही वेळापूर्वी वाजपेयींना पाहण्यासाठी केजरीवाल एम्स रुग्णालयात गेले होते. यानंतरच केजरीवाल यांचे मीडिया सल्लागार नागेंद्र शर्मा यांनी ही माहिती दिली.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more