Short News

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; भाजपच्या २ आमदारांसह तिघांची नावे

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; भाजपच्या २ आमदारांसह तिघांची नावे

एका सेक्स रॅकेट प्रकरणात ३ आमदारांचा समावेश असल्याचे धक्कादायक वृत्त पुढे आले आहे. एकूण तिंघांपैकी २ आमदार भाजपचे आहेत. तर, तिसरा आमदार AIUDF पक्षाचा आहे. पोलीस एफआयआरमध्ये ज्या तीन आमदारांचा समावेश आहे. त्यात भाजपचे आमदार अमिनुल हक लस्कर आणि किशोर नाथ आणि AIUDF च्या निजाम उद्दीन चौधरी यांच्या नावाचा समावेश आहे. हे प्रकरण असम राज्यातील आहे.
कॅन्सरशी झुंज देणाऱ्या इरफान खानने घेतला 'हा' मोठा निर्णय

कॅन्सरशी झुंज देणाऱ्या इरफान खानने घेतला 'हा' मोठा निर्णय

बॉलिवूड अभिनेता इरफान खान सध्या लंडन येथे कॅन्सरवर उपचार घेत आहे. तो या आजारातून लवकरात लवकर बरा व्हावा याकरता बॉलिवूड कलाकारांसह त्याचे चाहतेही प्रार्थना करत आहे. कॅन्सरशी झुंज देणाऱ्या इरफानने एक मोठा निर्णय घेतला आहे. जो त्याने एका पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर केला आहे. अचानक त्याच्या आजाराबद्दल कळल्यामुळे त्याने पुढील चित्रीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे.
'उमरला ठार मारुन आम्हाला देशवासियांना स्वातंत्र्यदिनाची भेट द्यायची होती'

'उमरला ठार मारुन आम्हाला देशवासियांना स्वातंत्र्यदिनाची भेट द्यायची होती'

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद याच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचे धागेदोरे समोर आले आहेत. मात्र, त्यापूर्वीच दोन तरुणांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओत दोन तरुण आपणच उमर खालिदवर हल्ला केल्याचे सांगत आहेत. उमरला ठार मारुन आम्हाला देशवासियांना स्वातंत्र्यदिनाची भेट द्यायची होती, असे या तरुणांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री होणे साधी गोष्ट नव्हे- रामदास कदम

मुख्यमंत्री होणे साधी गोष्ट नव्हे- रामदास कदम

शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांमध्ये विळ्याभोपळ्याचे सख्य असले तरी नांदेड शहरात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाले. याठिकाणी एका उड्डाणपुलाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि नांदेडचे विद्यमान पालकमंत्री रामदास कदम एकत्र आले होते. यावेळी रामदास कदम यांनी अशोक चव्हाणांचा सत्कार करत त्यांची प्रशंसाही केली. मी चव्हाणांचा सत्कार केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more