Short News

ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार सरदार  पटेल यांच्या पुतळ्याचे काम

ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे काम

गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारणीचे काम 25 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल, असे निवेदन सरकारतर्फे प्रसिद्ध करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 182 मीटर उंच असलेल्या या पुतळ्याचे उद्घाटन सरदार पटेल यांच्या जयंती दिवशी म्हणजेच 31 ऑक्टोबर रोजी करण्याची घोषणा राज्य सरकारने यापूर्वीच केली आहे.  मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी या कामाचा आढावा घेतला. 
पकोडयाच्या वादातून सासूची हत्या करणाऱ्या जावयाला अटक

पकोडयाच्या वादातून सासूची हत्या करणाऱ्या जावयाला अटक

पकोडे तळण्यावरुन झालेल्या वादातून सासूची हत्या करणाऱ्या जावयाला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपी आफ्रोझ (24) मागच्या काही महिन्यांपासून फरार होता. पोलीस त्याच्या मागावर होते. पोलिसांनी 10 किलोमीटपर्यंत त्याचा पाठलाग करुन उत्तरप्रदेश गाझीपूरच्या शेतामधून त्याला अटक केली. आफ्रोझचे मागच्या वर्षी शाईस्ता नावाच्या तरुणीबरोबर लग्न झाले. त्यांनी दिल्लीच्या रामपूरा भागात राहत होता.
Asia Cup 2018 : भारताचा पाकिस्तानवर 8 विकेटने विजय

Asia Cup 2018 : भारताचा पाकिस्तानवर 8 विकेटने विजय

भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 163 धावांवर रोखले होते. त्यांनतर भारतीय फलंदाजांनी 29 षटकांत 2 विकेटच्या मोबदल्यात हे लक्ष प्राप्त करत पाकिस्तानवर 8 विकेटने विजय प्राप्त केला आहे. भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक 52 धावा केल्या तर शिखर (46) अंबाती रायडू (31) आणि दिनेश कार्तिक (31)ने देखील चांगली फलंदाजी करत भारताचा विजय सोप्पा बनवला. या विजयासह भारत अ गटात आता पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे.
' दारुड्या मुलाला आईनेच केले  ठार

' दारुड्या मुलाला आईनेच केले ठार

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये आईनेच पोटच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येप्रकरणी पोफळीतील आरोपी राजेश्वरी पवारवर खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. विक्रांत पवार असे मृत मुलाचे नाव आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आई-मुलाच्या अतूट नात्याला या आईने एका क्षणात संपवले. त्यामुळे ही आई की वैरी असा सवाल आता निर्माण होतो. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more