Short News

काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात यश

काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात यश

कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडामध्ये रविवारी झालेल्या चकमकीदरम्यान भारतीय सैन्याने चार दहशतवाद्यांना जिवंत पकडले. अल बद्र या दहशतवादी संघटनेत नव्याने दाखल झालेले हे दहशतवादी सीमेवरुन घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. हंदवाडा परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती भारतीय जवानांना मिळाली होती. यानंतर भारतीय लष्कर आणि स्थानिक पोलिसांनी या दहशतवाद्यांना अटक करण्यासाठी सापळा रचला.
गणेश विसर्जन मिरवणुकीत महाजनांनी वाजवला ढोल

गणेश विसर्जन मिरवणुकीत महाजनांनी वाजवला ढोल

नाशिक शहरातील गणपती विसर्जन मिरवणुकीत पालकमंत्री गिरीश महाजन आणि महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आज ठेका धरला. विसर्जन मिरवणूक सकाळी अकरा वाजता सुरू होणार होती. मात्र ती दुपारनंतर सुरू झाली. या मिरवणुकीत महाजन यांनी सहभाग घेत ढोल वाजला. यावेळी महापौर रंजना भानशी, खासदार हेमंत गोडसे, गजानन शेलार उपस्थित होते. 
60 माओवाद्यांनी भरचौकात केली 'त्या' आमदारांची हत्या

60 माओवाद्यांनी भरचौकात केली 'त्या' आमदारांची हत्या

आंध्रप्रदेशच्या दंबारीकुडा भागात रविवारी दुपारी माओवाद्यांनी तेलगु देसम पार्टीच्या दोन नेत्यांची गोळया झाडून निघृर्ण हत्या केली. किदारी सर्वैश्वर राव हे अराकु विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. तर सिवरी सोमा हे माजी आमदार आहेत. सीपीआय माओवादी स्थापना दिनाचा कार्यक्रम सुरु असताना या हत्या करण्यात आल्या. माओवाद्यांनी आठवडाभर 27 सप्टेंबरपर्यंत स्थापना दिन साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. 
वाशिममध्ये बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीस सुरुवात

वाशिममध्ये बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीस सुरुवात

राज्यात पुण्यानंतर सर्वाधीक काळ चालणाऱ्या वाशिम येथील गणेश विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला आहे. वाशीमच्या शिवाजी चौकातून ढोल ताशाच्या गजरात या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. वाशिममधील गणेश विसर्जन मिरवणूक सर्वाधिक काळ चालणाऱ्या मिरवणुकींपैकी एक आहे. खासदार भावना गवळी यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर विसर्जनाला सुरुवात झाली. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more