Short News

'गोडसेपूर्वी जन्मले असते तर मीच गांधीला गोळ्या घातल्या असत्या'

'गोडसेपूर्वी जन्मले असते तर मीच गांधीला गोळ्या घातल्या असत्या'

उत्तरप्रदेशच्या मेरठ स्थित गठित पहिल्या 'हिंदू कोर्ट'ची पहिली न्यायाधीश डॉ. पूजा शकुन पाण्डेय हिनं एक वक्तव्य वादात अडकलंय. 'मी अभिमानाने सांगतेय की जर नथूराम गोडसेपूर्वी मी जन्मले असते तर मीच गांधीला गोळ्या घातल्या असत्या... मला अभिमान आहे की मी आणि माझी संघटना अखिल भारत हिंदू महासभा नथूराम गोडसेची पूजा करतात' असं पूजा पाण्डेय हिनं म्हटलंय. 
पुण्यात विसर्जन मिरवणुकींना सुरुवात;  अनेक मंडळांचा विसर्जनावर बहिष्कार

पुण्यात विसर्जन मिरवणुकींना सुरुवात; अनेक मंडळांचा विसर्जनावर बहिष्कार

पुण्यात गणेश विसर्जनाला सुरुवात झाली आहे. यात मानाचा पहिली गणपती कसबा गणेश विसर्जनाची मिरवणूक निघाली आहे. जवळपास सर्वच रस्ते बाप्पांच्या विसर्जनासाठी रांगोळ्यांनी सजले आहेत. सर्वत्र विसर्जनाची जय्यत तयारी केली जात आहे. सार्वजनिक गणेश मंडळांसह घरातील गणपतींच्याही विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या आहेत. त्यातच शहरातील 100 ते सव्वाशे गणेश मंडळांनी विसर्जनावर बहिष्कार घातला आहे. 
राहुल गांधींचे आरोप तथ्यहीन; राफेल करार रद्द होणार नाही- जेटली

राहुल गांधींचे आरोप तथ्यहीन; राफेल करार रद्द होणार नाही- जेटली

राफेल विमान खरेदीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना अर्थमंत्री अरुण जेटलींनी प्रत्युत्तर दिले. टीका करताना शब्दांचा वापर जपून करा, असा सल्लाही जेटलींनी राहुल यांना दिला आहे. काँग्रेसचे सर्व आरोप बिनबुडाचे असून राफेल करार रद्द होणार नाही. लोकशाहीत तुम्हाला टीका करण्याचा अधिकार आहे. पण त्यासाठी शब्दांची निवड काळजीपूर्वक करायला हवी,असेही ते म्हणाले. 
जम्मू-काश्मीरमधील पोलिसांच्या हत्येमागे पाकिस्तानचाच हात

जम्मू-काश्मीरमधील पोलिसांच्या हत्येमागे पाकिस्तानचाच हात

जम्मू-काश्मीरमधील पोलिसांच्या हत्येमागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे भारतीय सुरक्षा दलांना मिळाले आहेत. पाकिस्तानची गुप्तहेर यंत्रणा असलेल्या आयएसआयच्या सूचनेवरुन दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील तीन विशेष पोलीस अधिकाऱ्यांची हत्या केल्याचे पुरावे भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागले आहेत.पाकिस्तानकडून येणारे मेसेज भारतीय सुरक्षा दलांनी इंटरसेप्ट केले आहे. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more