Short News

' नेहरुऐवजी जर जिन्ना पंतप्रधान झाले असते तर...'

' नेहरुऐवजी जर जिन्ना पंतप्रधान झाले असते तर...'

नेहरूऐवजी जिन्ना पंतप्रधान असते तर भारत-पाकिस्तान फाळणी झाली नसती असे वक्तव्य तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी केले आहे. गोवा इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी विद्यार्थांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. ‘महात्मा गांधी मोहम्मद जिन्ना यांना पंतप्रधान करणार होते. पण नेहरू यांना ते मान्य नव्हते. नेहरू यांनी पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त केली होती.
कॉसमॉस बँकेची आर्थिक स्थिती उत्तम: अध्यक्ष

कॉसमॉस बँकेची आर्थिक स्थिती उत्तम: अध्यक्ष

'कॉसमॉस सहकारी बँकेची आर्थिक स्थिती उत्तम आहे. बँकेवर झालेल्या सायबर हल्ल्यात बँकेच्या कोअर बँकिंग यंत्रणेवर कोणताही परिणाम झालेला नाही. त्यामुळे खातेदारांची खाती व माहितीही सुरक्षित आहे. त्यामुळे खातेदारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये,' असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी केले आहे. 'बँक दर वर्षी बँकेचा सर्व्हर व अन्य यंत्रणांचे सायबर ऑडिट करून घेत असते.
व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे घटस्फोट

व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे घटस्फोट

त्यांचे लग्न टिकले अवघे चार महिनेच... एकमेकांबरोबर पटत नसल्यामु‌ळे ते वेगळे झाले... तो अमेरिकेत गेला; तर ती जर्मनीमध्ये... दोघांनी पुणे फॅमिली कोर्टात परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल केला...व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे साक्ष नोंदवून भारतात न येताच त्यांचा वेगळा होण्याचा मार्ग मोकळा झाला... फॅमिली कोर्टाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला.
अटल बिहारी वाजपेयींचे पार्थिव भाजपा मुख्यालयात, मोदींनी घेतले अंत्यदर्शन

अटल बिहारी वाजपेयींचे पार्थिव भाजपा मुख्यालयात, मोदींनी घेतले अंत्यदर्शन

माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी संध्याकाळी निधन झाले. त्यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी दिल्लीतील निवासस्थानातून भाजपा मुख्यालयाकडे रवाना झाले. तिथे सर्वसामान्यांना पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा मुख्यालयात अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more