Short News

केरळ पुरग्रस्तांसाठी एसटीकडून १० कोटींची मदत

केरळ पुरग्रस्तांसाठी एसटीकडून १० कोटींची मदत

मुसळधार पावसाने केरळचे जनजीवन पुरते कोलमडले. केरळच्या मदतीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी हात पुढे केलाय. केरळ पूरग्रस्तांसाठी एसटी महामंडळ आणि कर्मचाऱ्यांनी १० कोटींची मदत दिली आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्यासह एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला आहे.
सोमवारपासून मुंबई मेट्रोच्या ४४ फेऱ्या वाढणार

सोमवारपासून मुंबई मेट्रोच्या ४४ फेऱ्या वाढणार

मुंबई मेट्रो वनने मेट्रो प्रवाशांना गणपती भेट दिली असून वर्सोवा ते घाटकोपर मार्गावर धावणा-या मेट्रोच्या येत्या सोमवार (दि. २४)पासून ४४ फे-या वाढणार आहेत. त्यानुसार आता दररोज ३९६ऐवजी ४४० फेºया होणार असून सोमवार ते शुक्रवार ही सेवा उपलब्ध असेल.सध्या सणांचे दिवस लक्षात घेता मेट्रोने प्रवास करण्याकडे प्रवाशांचा वाढता कल लक्षात घेता ही सुविधा मुंबई मेट्रो वनने उपलबध करून दिली.
काश्मीरमधून बेपत्ता झालेल्या चारपैकी तीन पोलिसांची दहशतवाद्यांकडून हत्या

काश्मीरमधून बेपत्ता झालेल्या चारपैकी तीन पोलिसांची दहशतवाद्यांकडून हत्या

जम्मू काश्मीरच्या शोपियांमधून तीन एसपीओसहित चार पोलीस बेपत्ता झाले आहेत. या सगळ्यांचं अपहरण दहशतवाद्यांनी केलं. त्यापैकी एका पोलिसाला त्यांनी सोडलं असून इतर तिघांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने काही दिवसांपूर्वीच जम्मू काश्मीरमधील पोलिसांना नोकरी सोडण्याची धमकी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर ही घटना समोर आली आहे.
गीर अभयारण्यात 11 सिंहांचे मृतदेह आढळले

गीर अभयारण्यात 11 सिंहांचे मृतदेह आढळले

गुजरातमधल्या गीर अभयारण्यात गेल्या काही दिवसांमध्ये 11 सिंहांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या मृत्यू मागचे कारण अद्याप समोर आले नसून अभयारण्याच्या पूर्व भागात या सिंहाचे मृतदेह आढळले आहे. या सर्व सिंहांचे मृत्यू हा नैसर्गिक असल्याची माहिती वनअधिकाऱ्यांनी दिली. तसेच सर्व सिंहांचे शवविच्छेदन करून अंतिम अहवाल आल्यावर सिंहांच्या मृत्यूचं कारण समजू शकेल.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more