Short News

केरळ: ओणम सणावर दु:खाची छाया

केरळ: ओणम सणावर दु:खाची छाया

केरळमध्ये ओणम सण अतिशय महत्त्वाचा. मात्र, महापुरामुळे यंदा ओणम सणावर दु:खाचं सावट पसरलंय. राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा हा सण यंदा काही रिलीफ कॅम्पमध्येच अगदी साधेपणानं साजरा केला जाणार आहे. पुरामुळे राज्यातील ७ हजार घरं पूर्णपणे उद्धवस्त झालीत तर ५० हजार घरांचं मोठं नुकसान झालंय.
धोनीची जबरदस्त स्टंपिंग, अंपायरच्या निर्णयाआधीच निघून गेला पाकिस्तानचा खेळाडू

धोनीची जबरदस्त स्टंपिंग, अंपायरच्या निर्णयाआधीच निघून गेला पाकिस्तानचा खेळाडू

आशिया चषकच्या दुसऱ्या सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. भारतीय टीमचा विकेटकीपर महेंद्र सिंह धोनीने या सामन्यात पुन्हा एकदा जबरदस्त स्टंपिंग केली. धोनीच्या या स्टंपिंग नंतर पाकिस्तानचा खेळाडू स्वत:च पव्हेलियनकडे निघाला. अंपायरने भारतीय टीमने अपील केल्यानंतर थर्ड अंपायरकडे इशारा केला. पण थर्ड अंपायरचा निर्णय येण्याआधीच पाकिस्तानचा हा खेळाडू तेथून निघून गेला होता.
शत्रुघ्न सिन्हा यांचं तिकीट कापून या नेत्याला तिकीट देणार

शत्रुघ्न सिन्हा यांचं तिकीट कापून या नेत्याला तिकीट देणार

लोकसभा निवडणूक जवळ येत असताना, राजकीय वातावरण देखील तापत आहे. एनडीएमधील जागावाटप आणि उमेदवारांची अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. पण लवकरच याची घोषणा होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी भाजप आणि जेडीयूकडून सांगण्यात आलं होतं की, जागावाटप लवकरच स्पष्ट होईल. काही सीटच्या बाबतीत अजूनही बिहारमध्ये वाटाघाटी सुरू आहेत, त्यातील पटना साहिब सर्वात महत्वाची जागा आहे. 
भारतीय अर्थव्यवस्था अमेरिकेला टाकणार मागे

भारतीय अर्थव्यवस्था अमेरिकेला टाकणार मागे

सद्यस्थितीत अमेरिका ही सर्वात प्रबळ आर्थिक महासत्ता असली तरी २०५०पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ही अमेरिकी अर्थव्यवस्थेला मागे टाकेल, असा दावा लोवी इन्स्टिट्युटच्या (सिडने, ऑस्ट्रेलिया) सर्वेक्षण अहवालामध्ये करण्यात आला आहे. या इन्स्टिट्युटतर्फे आशिया पॅसिफिक क्षेत्रातील तब्बल २५ देशांची स्थिती जाणून घेण्यात आली. तसेच, या देशांतील भावी बदलांचा वेध घेण्यात आला. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more