Short News

नक्षलवाद्यांनी उखडला रुळ, पॅसेंजर रेल्वे घसरली

नक्षलवाद्यांनी उखडला रुळ, पॅसेंजर रेल्वे घसरली

नक्षलवाद्यांनी रेल्वे रुळ उखडल्याने पॅसेंजर रेल्वे रुळाच्या खाली घसरली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना दंतेवाडा परिसरात बुधवारी रात्री उशीरा घडली. सुरक्षा दलाच्या जवानांनी १५ नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याने नक्षलवादी कारवायात वाढ झाली आहे. यापूर्वीही नक्षलवाद्यांनी एका बस आणि ट्रकला लक्ष्य केले होते.
'इस जनम मे तो नही';  आशुतोष यांच्या राजीनाम्यानंतर केजरीवालांचे ट्विट

'इस जनम मे तो नही'; आशुतोष यांच्या राजीनाम्यानंतर केजरीवालांचे ट्विट

आम आदमी पक्षाचे प्रवक्ते आणि नेते आशुतोष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आशुतोष यांच्याकडे पक्षाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी होती. आशुतोष यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आशुतोष यांच्या राजीनाम्यानंतर आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा स्विकारणार नसल्याचे म्हटले आहे. ना, इस जनम मे तो नही,असे ट्विट करत अरविंद केजरीवाल यांनी उत्तर दिले. 
ध्वजारोहणाच्या वेळी अमित शाह यांच्या हातून निसटला झेंडा

ध्वजारोहणाच्या वेळी अमित शाह यांच्या हातून निसटला झेंडा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या हस्ते भाजपच्या मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. मात्र अमित शाह यांनी झेंडा फडकवण्यासाठी जेव्हा दोरी हाती घेतली तेव्हा आपला राष्ट्रध्वज खाली घरंगळत आला. आता हा तिरंगा खालीच पडतो की काय? असे वाटत होते मात्र तेवढ्यात अमित शाह यांनी दुसरी दोरी खेचली आणि झेंडा पुन्हा वर नेला व फडकवला. यावरुन काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more