Short News

16000 लोकांना ताब्यात घेतले, त्यापेक्षा माझ्यावर गोळ्या झाडा -  हार्दिक पटेल

16000 लोकांना ताब्यात घेतले, त्यापेक्षा माझ्यावर गोळ्या झाडा - हार्दिक पटेल

पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी आपल्या घरातच बेमुदत उपोषण सुरु केले आहे. यावेळी हार्दिक पटेल यांनी राज्य सरकारवर टीका केली. घरी येणारा लोकांना पोलिसांकडून ताब्यात घेण्याचे काम सुरु आहे. जवळपास 16 हजार लोकांना आतापर्यंत ताब्यात घेतले आहे. चारपेक्षा जास्त लोकांना पोलीस घरी येऊ देत नाहीत. असे हार्दिक पटेल यांनी सांगितले.
पत्नीचे बहिणीसोबत संबंध; पतीची पोलिसांत तक्रार

पत्नीचे बहिणीसोबत संबंध; पतीची पोलिसांत तक्रार

पत्नी ही लेस्बियन असून तिचे माझ्या चुलत बहिणीसोबत शारीरिक संबंध आहे, असा आरोप करीत एका व्यक्तीने पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संबंध तोडून टाकण्याचे सांगितल्यानंतर तिने आत्महत्या करण्याची धमकी दिल्याने मी व माझ्या कुटुंबातील व्यक्ती प्रचंड तणावाखाली असल्याचे त्याने म्हटले. उत्तरप्रदेशमधील कानपूरमध्ये ही घटना उघडकीस आली आहे. या जोडप्याचा 5 महिन्यापूर्वीच विवाह झाला आहे. 
Asia Cup 2018 : पाकिस्तानचा संघ 162 धावात गारद

Asia Cup 2018 : पाकिस्तानचा संघ 162 धावात गारद

आज भारत-पाकिस्तानचा सामना होत आहे. नाणेफेक जिंकत पाकिस्तानने प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. परंतु भारतीय गोलंदाजांपुढे पाकिस्तानच्या फलंदाजांनी नांगी टाकली. आत्मविश्वासासह भारतीय संघ मैदानात उतरला. भारताने दमदार सुरुवात करत पाक संघाची सलमीवीर जोडी स्वस्तात माघारी पाठवली. सुरुवातीचे दोन विकेट्स भुवनेश्वर कुमारने घेतल्या.भारतीय गोलंदाजांनी 162 धावात  पाकिस्तान संघाचा धुव्वा उडवला.
भारत -पाक सामन्यात गोलंदाजी करताना हार्दिकला दुखापत

भारत -पाक सामन्यात गोलंदाजी करताना हार्दिकला दुखापत

आशिया चषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने चागंली सुरुवात केली. मात्र एक चिंतेची बाब ही आहे. ती म्हणजे अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्य़ा गोलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाला आहे. पाठीत त्रास जाणवल्यामुळे त्याला स्ट्रेचरवर बाहेर नेण्यात आले. अठराव्या षटकात गोलंदाजी करताना चेंडू फेकताना पंड्या खाली कोसळला. यानंतर त्याला प्रचंड वेदना झाल्याचेही दिसून आले. अखेर त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले . 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more