Short News

गोवा अकाऊंटंट : 80 जागांसाठी 8 हजार परीक्षार्थी, निकाल 'शून्य' टक्के!

गोवा अकाऊंटंट : 80 जागांसाठी 8 हजार परीक्षार्थी, निकाल 'शून्य' टक्के!

गोवा सरकारतर्फे आयोजित अकाऊंटट पदाच्या परीक्षेत चक्क 100 टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. सरकारतर्फे नुकतीच 80 अकाऊंटट पदांच्या भरतीसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. त्यात 8 हजार परीक्षार्थींनी सहभाग नोंदविला होता. विशेष म्हणजे, एकही परीक्षार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकला नाही. यामुळे पुन्हा एकदा शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
..यामुळे प्रेक्षकांनी दिल्या ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषणा

..यामुळे प्रेक्षकांनी दिल्या ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषणा

भारत आणि पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानवर 8 गडी राखून विजय मिळवला. कालच्या सामन्यामधील हा व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय पाठीराखे विरुद्ध पाकिस्तानी पाठिराख्यांची घोषणाबाजीची स्पर्धा सुरू असल्याचे दिसत आहे. प्रेक्षकांच्या स्टॅण्डमध्येच पाकिस्तानी पाठिराखे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत आहेत. त्यानंतर भारतीयांनी याला गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा देत उत्तर दिले. 
शाहरुख खानने चुटकीसरशी पूर्ण केले अनुष्काचे चॅलेंज

शाहरुख खानने चुटकीसरशी पूर्ण केले अनुष्काचे चॅलेंज

यश राज फिल्म्स बॅनरअंतर्गत तयार झालेला ‘सुई धागा' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ‘मेक इन इंडिया' या थीमवर आधारित आहे. यामध्ये अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाच्या टीमने #suidhaagachallenge हा नवा ट्रेंड सुरु केला. वरुण आणि अनुष्काने शाहरुख खानला हे चॅलेंज दिले होते. शाहरुखने काही सेंकदात हे चॅलेंज पूर्ण केले. 
‘राफेल मंत्र्यां’नी राजीनामा द्यावा; राहुल गांधींचा हल्लाबोल

‘राफेल मंत्र्यां’नी राजीनामा द्यावा; राहुल गांधींचा हल्लाबोल

राफेल लढाऊ विमाने खरेदी प्रकरणावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने सरकारवर निशाणा साधत आहेत. आज त्यांनी पुन्हा ट्विट करीत संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांच्यावर खोटे बोलल्याचा आरोप करीत हल्लाबोल केला. सीतारामन यांना राफेल मंत्री असे संबोधत त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. एचएएल या स्वदेशी कंपनीला ठेका न दिल्याने राहुल गांधी यांनी ही टीका केली. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more