Short News

ज्यांना भारत समजला नाही, त्यांना संघ कसा समजणार? : संघाचा पलटवार

ज्यांना भारत समजला नाही, त्यांना संघ कसा समजणार? : संघाचा पलटवार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी तुलना मुस्लिम ब्रदरहूडशी करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना आता संघाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राहुल गांधी यांना भारतच समजला नाही. त्यामुळे त्यांना संघदेखील समजणार नाही, अशा शब्दांमध्ये संघाने राहुल गांधींवर पलटवार केला आहे. लंडनमध्ये भाषण करताना राहुल गांधींनी संघावर निशाणा साधला होता. संघाचे प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी प्रत्युत्तर दिले. 
काश्मीरमधून चार पोलीस बेपत्ता; अपहरणाचा संशय

काश्मीरमधून चार पोलीस बेपत्ता; अपहरणाचा संशय

हिजबुल मुजाहिद्दीनने जम्मू-काश्मीरमधील सर्व पोलिसांना नोकरी सोडण्याची दिलेली धमकी ताजी असतानाच शोपियांमधून तीन एसपीओ सहीत चार पोलीस बेपत्ता झाल्यानं खळबळ उडाली. या तिन्ही पोलिसांचं अपहरण झालं असावं असा संशय स्थानिकांनी व्यक्त केला असून या पोलिसांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. अपहरण करण्यात आलेल्यांमध्ये तीन स्पेशल पोलीस ऑफिसर (एसपीओ) आणि एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
मीडियाला बोलवून पोलिसांनी केला दोघांचा एन्काऊंटर

मीडियाला बोलवून पोलिसांनी केला दोघांचा एन्काऊंटर

उत्तर प्रदेशात पोलिसांनी ऑन कॅमेरा दोन जणांचा एन्काऊंटर केला आहे. अलिगड जिल्ह्यात हा एन्काऊंटर करण्यात आला. विशेष म्हणजे मीडियाला बोलावून पोलिसांना हा एन्काऊंटर केला. एवढंच नाही तर एन्काऊंटर कॅमेऱ्यात शूट करण्याची परवानगीही पोलिसांकडून मीडियाला देण्यात आली. एन्काऊंटर करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींवर 6 जणांच्या हत्येचा आरोप होता. दोन साधूंच्या हत्येतही आरोपींचा समावेश होता.
पेट्रोल आणि डिझेलनंतर आता सीएनजीच्या दरात देखील होणार वाढ

पेट्रोल आणि डिझेलनंतर आता सीएनजीच्या दरात देखील होणार वाढ

डॉलरच्या तुलनेत घसरत असलेल्या रुपयांचा परिणाम इंधनाच्या दरावर होऊ लागला आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडत असताना सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. घरगुती वापरासाठी असलेल्या पीएनजी गॅसच्या दराची किंमत ऑक्टोबर महिन्यात ठरवण्यात येणार आहे. देशांतर्गत गॅसच्या बेस प्राइजमध्ये प्रति युनिट १४ टक्के म्हणजे ३.५ डॉलरने (जवळपास २५२ रुपये) वाढ होण्याचा अंदाज आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more