Short News

पाकिस्तानबद्दल नरेंद्र मोदींकडे कुठलीही रणनिती नाही : राहुल गांधी

पाकिस्तानबद्दल नरेंद्र मोदींकडे कुठलीही रणनिती नाही : राहुल गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पाकिस्तान आणि डोकलाम मुद्द्यावरून पुन्हा पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. पाकिस्तानशी चर्चा करण्याबाबत गंभीरपणे विचार करून तयार केलेले कोणतेही धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नसून ते डोकलाम प्रश्नाकडेही एखाद्या इव्हेंटप्रमाणे पाहत आहेत,अशी टीका राहुल गांधी यांनी केली. ते लंडनमधील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक येथे बोलत होते.   
यूपीएच्या काळात देशाच्या अर्थव्यस्थेला NPA चा कॅन्सर- भाजप

यूपीएच्या काळात देशाच्या अर्थव्यस्थेला NPA चा कॅन्सर- भाजप

यूपीएच्या काळात म्हणजेच देशाच्या अर्थव्यवस्थेला NPA (वाढते थकित कर्ज) च्या कॅन्सरची लागण झाली अशी टीका भाजपने केली आहे. यासंदर्भात भाजपने एक पाच मिनिटांचा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यामध्ये मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे फोटो दाखवण्यात आले आहेत. यूपीएने NPA च्या रुपाने देशाला शाप दिला आहे असे लिहिण्यात आले आहे.
औरंगाबादेत कुलर बनविण्याऱ्या आनंद इंडस्ट्रीजला आग

औरंगाबादेत कुलर बनविण्याऱ्या आनंद इंडस्ट्रीजला आग

चिकलठाणा एमआयडीसीतील एअर कुलर बनविणाऱ्या आनंद इंडस्ट्रीज या कंपनीला शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली. आगीत सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने महावितरणचे "शटडाऊन' असल्याने जीवितहानी टळली आहे. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. चिकलठाणा एमआयडीसीतील गरवारे कंपनीच्या मागे कुंदन शिवाजी रेड्डी यांच्या मालकीची आनंद इंडस्ट्रीज कंपनी आहे.   
अजामीनपात्र वॉरंटविरोधात मेहुल चोक्सी उच्च न्यायालयात

अजामीनपात्र वॉरंटविरोधात मेहुल चोक्सी उच्च न्यायालयात

पीएनबी गैरव्यवहार प्रकरणी फरार असलेल्या मेहुल चोक्सीने अजामीनपात्र वॉरंटविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मेहुल चोक्सीने आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला. सीबीआय न्यायालय आणि त्यानंतर विशेष पीएमएलए न्यायालयाने मेहुल चोक्सी व अन्य पाच जणांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या दोघांनीही पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींना चुना लावल्याचा आरोप आहे. 
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more