Short News

रामदास आठवले केरळ दौऱ्यावर, पूरग्रस्तांना दिले 2 महिन्यांचे वेतन

रामदास आठवले केरळ दौऱ्यावर, पूरग्रस्तांना दिले 2 महिन्यांचे वेतन

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले केरळ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मंत्रिपदाचे दोन महिन्यांचे वेतन धनादेशाच्या रुपाने केरळमधील मल्लपूरम जिल्ह्याच्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या हाती सोपवले. तसेच खासदार निधीमधील काही रक्कम पूरग्रस्तांच्या मदतनिधीला देत असल्याचे केरळच्या मल्लपूरम येथे रामदास आठवलेंनी जाहीर केले. 
मध्यप्रदेशात पंतप्रधान मोदींचा महामेळावा

मध्यप्रदेशात पंतप्रधान मोदींचा महामेळावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्यप्रदेशची राजधानी भोपळ दौऱ्यावर भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या महामेळाव्याला संबोधित करणार आहेत. भोपाळमध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज १० लाख कार्यकर्त्यांचा महामेळावा आयोजित केला आहे. या सभेसाठी राज्यातल्या २३० मतदारसंघातील ६५ हजार बुथस्तरावरील कार्यकर्ते भोपाळमध्ये दाखल होत आहेत.
मुंबईत आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ

मुंबईत आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आजही वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात 14 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे आज मुंबईकरांना एक लिटर पेट्रोलसाठी 90.22 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातील वाढदेखील सुरुच आहे. आज मुंबईत डिझेलच्या दरात 11 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे एक लिटर डिझेलचा दर 78.69 रुपयांवर पोहोचला आहे. आज दिल्लीकरांना एक लिटर पेट्रोलसाठी 82.86, तर डिझेलसाठी 74.12 रुपये मोजावे लागतील.
‘पटाखा’चा दुसरा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

‘पटाखा’चा दुसरा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

सख्ख्या बहिणी पण पक्क्या वैरिणी, अशा दोघींची कथा घेऊन दिग्दर्शक विशाल भारद्वाज ‘पटाखा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. एकमेकींना सदैव पाण्यात पाहणाऱ्या या दोन बहिणींची धम्माल कथा ‘पटाखा'मध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा आता दुसरा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. पहिल्या ट्रेलरची कथा जिथे संपते, तिथूनच दुसऱ्या ट्रेलरला सुरुवात होते.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more