Short News

ऐतिहासिक रामलीला मैदानाला अटल बिहारी वाजपेयींचे नाव ?

ऐतिहासिक रामलीला मैदानाला अटल बिहारी वाजपेयींचे नाव ?

दिल्लीतील रामलीला मैदानाला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव दिले जाण्याची शक्यता आहे. उत्तर दिल्ली महापालिकेने या संदर्भातील प्रस्ताव तयार केला असून ३० ऑगस्ट रोजी हा प्रस्ताव महासभेत सादर केला जाणार आहे. दिल्लीतील ऐतिहासिक आंदोलनांचे साक्षीदार असलेले मैदान म्हणजे रामलीला मैदान. ब्रिटिशांच्या काळात रामलीला मैदान हा एक मोठा तलाव होता. मात्र, यानंतर तलावात भर टाकून मैदान तयार केले. 
पालघरमध्ये अल्पवयीन मुलीवर गणेश मंडपाच्या बाहेर बलात्कार

पालघरमध्ये अल्पवयीन मुलीवर गणेश मंडपाच्या बाहेर बलात्कार

पालघर जिल्ह्यात गणेशोत्सवादरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. गणपती पाहण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर 24 वर्षीय तरुणाने बलात्कार केला. ही घटना डहाणू येथील आगर या गावात घडली. या प्रकरणी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मंडपाच्या ठेकेदाराचा शोध पोलीस घेत आहेत. मंडपात पुजा करण्यासाठी आलेल्या 13 वर्षीय मुलीवर एका 24 वर्षीय युवकाने बलात्कार केला. 
राम मंदिर लवकरात लवकर व्हायला हवं: मोहन भागवत

राम मंदिर लवकरात लवकर व्हायला हवं: मोहन भागवत

अयोध्येत राममंदिराची उभारणी लवकरात लवकर व्हावी, असे आग्रही प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी केले. या प्रश्नावर संवाद व्हावा, मात्र मंदिरासाठी चळवळ उभारणाऱ्या राम मंदिर समितीचा याबाबत अंतिम निर्णय असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. मंदिर उभारणीसाठी वटहुकूम काढणार का, याबाबत आपण काही सांगू शकणार नाही, असे ते म्हणाले.
23 सप्टेंबरला पुन्हा एकदा भारत - पाकिस्तान सामना

23 सप्टेंबरला पुन्हा एकदा भारत - पाकिस्तान सामना

हाँगकाँगला हरवल्यामुळे भारत आणि पाकिस्तानच्या टीम याआधीच आशिया कपच्या सुपर-4मध्ये पोहोचल्या होत्या. आता सुपर-4मध्ये 23 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तानचा पुन्हा सामना होणार आहे. भारत, पाकिस्तान या ग्रुप एमधून तर बांगलादेश आणि अफगाणिस्तान ग्रुप बीमधून सुपर-4मध्ये पोहोचल्या आहेत. भारत आणि पाकिस्तान फायनलमध्ये गेले तर त्यांची पुन्हा एकदा 28 सप्टेंबरला फायनल होईल.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more