Short News

लालू प्रसाद यादव यांना हायकोर्टाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला

लालू प्रसाद यादव यांना हायकोर्टाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला

घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना रांची हायकोर्टाने दणका दिला आहे. सध्या जामिनावर बाहेर असणा-या लालू प्रसाद यादव यांनी तब्येतीचे कारण देत जामीन वाढविण्याची याचिका हायकोर्टात दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हायकोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. 
पत्नीसह व्हिडिओ कॉलवरुन बोलताना पतीची आत्महत्या

पत्नीसह व्हिडिओ कॉलवरुन बोलताना पतीची आत्महत्या

पत्नीसोबत व्हिडिओ कॉलवरुन बोलत असताना एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मध्यप्रदेशात इंदूरमधील एरोड्रम भागात रविवारी रात्री ही घटना घडली. रणजीत (32) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कौटुंबिक वादामुळे पत्नी तिच्या माहेरी बिहारला निघून गेल्यामुळे रणजीत खचला होता. रविवारी रात्री पत्नीसोबत व्हिडिओ कॉलवरुन बोलत असताना त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले.
भारताचे हाँगकाँगपुढे 286 धावांचे आव्हान

भारताचे हाँगकाँगपुढे 286 धावांचे आव्हान

हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात भारताने निर्धारित 50 षटकात 7 बाद 285 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून शिखर धवन याने गब्बर खेळी करत शतक ठोकले. त्याने 120 चेंडूत 127 धावा केल्या. या खेळीत त्याने 15 चौकार आणि 2 षटकारांची आतषबाजी केली. अंबाती रायडूनेही अर्धशतक झळकावले. हाँगकाँगकडून किंचित शाहने सर्वाधिक 3 बळी टिपले.
जळगावात पहिल्यांदाच महापौरपद भाजपकडे

जळगावात पहिल्यांदाच महापौरपद भाजपकडे

जळगाव मनपाच्या महापौरपदी भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे यांची निवड निश्चित झाली आहे. तर उपमहापौर पदी भाजपचे डॉ. अश्विन सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेतर्फे महापौर पदासाठी जयश्री महाजन आणि उपमहापौर पदासाठी प्रशांत नाईक यांचाही अर्ज देण्यात आला आहे. त्यावरही आज औपचारिक घोषणा होणार आहे. महापालिकेची निवडणूक गेल्या महिन्यात पार पडली होती.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more