Short News

घटस्फोटाचा अर्ज प्रलंबित असतानाही दुसरे लग्न करणे वैध: सर्वोच्च न्यायालय

घटस्फोटाचा अर्ज प्रलंबित असतानाही दुसरे लग्न करणे वैध: सर्वोच्च न्यायालय

घटस्फोटावरून जर दोन्ही पक्षांमध्ये खटला मागे घेण्याबाबत समझोता झाला असेल तर याचिका प्रलंबित असतानाही दुसरे लग्न करता येईल. सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करताना हा महत्वपूर्ण निकाल दिला. घटस्फोटाविरोधात दाखल करण्यात आलेले अपील फेटाळण्यापूर्वी जर पक्षकारांमध्ये खटला मागे घेण्यासाठी समझोता झाला असेल तर दुसरे लग्न करण्यावर बंदीबाबतची तरतूद लागू होत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. 
भर दुपारी घर फोडून चोरट्यांचा सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

भर दुपारी घर फोडून चोरट्यांचा सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

औरंगाबाद रेल्वेस्टेशन बाबा पंपाच्या रोडवरील शिल्पनगरातील सी.ए.चे घर फोडून चोरट्यांनी ७ लाखांचे सोन्याचे दागिने व रोख २२ हजार रुपये पळविल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. वेदांतनगर पोलीस ठाणे व गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. महेश अग्रवाल व त्यांची पत्नी हे दोघे कामानिमित्त नेहमीप्रमाणे गेले असता घरी कुणीच नव्हते.
संस्थाचालकानेच केला आश्रम शाळेतील मुलींवर लैंगिक अत्याचार

संस्थाचालकानेच केला आश्रम शाळेतील मुलींवर लैंगिक अत्याचार

सांगली कुरळप येथील आश्रम शाळेतील सहा मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मिनाई आश्रम शाळेत ही घटना घडली. याप्रकरणी शाळेच्या संस्थाचालकाला अटक करण्यात आली आहे. अरविंद पवार असे अटक करण्यात आलेल्या संस्थाचालकाचे नाव आहे. पवार याने सहा मुलींसोबत लैंगिक अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मुंबईत मोबाइल चोरणाऱ्या दिल्लीतील टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

मुंबईत मोबाइल चोरणाऱ्या दिल्लीतील टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात सकाळपासून चाकरमानी आपल्या रोजीरोटीसाठी घराबाहेर पडतात आणि रेल्वेने प्रवास करतात. त्याचवेळी परराज्यातून आलेले चोरटेही लोकलच्या गर्दीच्या वेळी मोबाईल चोरण्यासाठी बाहेर पडतात. गर्दीचा फायदा उचलून मोबाइल लांबवणारे दिल्लीतील दोन चोरटे गजाआड झाल्याने त्यांच्या कार्यपद्धतीचा पर्दाफाश झाला आहे. हे चोरटे दोन तीन साथीदारांच्या मदतीने मोबाइल लांबवतात.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. This includes cookies from third party social media websites and ad networks. Such third party cookies may track your use on Oneindia sites for better rendering. Our partners use cookies to ensure we show you advertising that is relevant to you. If you continue without changing your settings, we'll assume that you are happy to receive all cookies on Oneindia website. However, you can change your cookie settings at any time. Learn more